अहिल्याबाई होळकर काळातील विहिरींचे जतन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:36 PM2019-05-26T15:36:33+5:302019-05-26T15:36:39+5:30

धरणगावातील ऐतिहासिक विहिरी पाणी टंचाईवर ठरू शकतात उपाय

The wells of Ahilyabai Holkar era must be preserved | अहिल्याबाई होळकर काळातील विहिरींचे जतन हवे

अहिल्याबाई होळकर काळातील विहिरींचे जतन हवे

Next


शरदकुमार बन्सी।
धरणगाव: थोरसमाज सुधारक आणि पशु-पक्ष्यांसह मानवाच्या अन्न पाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पाणीदार विहिरींचे सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.धरणगाव शहरातील या विहिरी पाणी टंचाईवर प्रभावी उपाय ठरू शकतात,असे जाणकारांचे मत आहे.अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात गावागावात दगडी पाय विहीरींचे निर्माण केल्याने अनेक वर्षे त्या त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी या विहीरींचा आधार मिळाला होता. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या काळात या विहिरींनी पाणी टंचाई दूर होण्यास गावाला हातभार लावला होता.मात्र आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुरातन विहिरींची दूरवस्स्था झाल्याचे दिसत आहे.धरणगाव शहरात धर्मशाळेलगत, सांडेश्वर मंदिराजवळ, गुराई भागात साखर विहिर,गांधी उद्यानात व गावातील इतर ठिकाणी असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन विहिरी पाणी असूनही भग्नाअवस्थेत पडून आहेत. या विहीरींचा उपयोग काही ठिकाणी शहरवासीय कपडे धुणे आणि भांडी घासण्यासाघी करीत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, काही ठिकाणच्या या विहिरी गाळ व कचºयाने भरल्या आहेत. विहिरींना कुंपण न.पा. प्रशासनाने न घातल्याने या विहिरी कचरा कुंड्या झाल्या आहेत. विहिरींमध्ये आज पावेतो काही दुर्घटना झालेल्या नसल्याने त्या उघड्या अवस्थेत पडून आहेत. चार वषार्पासून शहराला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.तीन वर्षापूर्वी गांधी उद्यानालगतच्या व्दारकादास (भांगकुवा) विहिरीने शहराची तहान भागवली होती. पाणीपुरवठा योजना अपयशी ठरलेल्या काळात भांगकुवाने या शहराला तारल्याचा इतिहास आहे.
गाळ काढून नूतनीकरण करा
धरणगाव नगरपालिका प्रशासनाने गावातील या सर्व अहिल्याबाई यांच्या काळातील विहिरींमधील गाळ काढून त्यांचे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आता तरी या विषयाची प्रशासनाने दखल घेवून भविष्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी धरणगाव शहर आणि परिसतील पुरातन व दुर्लक्षीत विहिरींमधील गाळ,कचरा काढून त्यांचे पूर्नज्जीवन करुन त्यातील पाण्याचा उपाययोजना शहरवासीयांसाठी करावा,अशी अपेक्षा शहरातून व्यक्त केली जात आहे.शहतील पाणी टंचाईवर हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तसे नियोजन करण्याची गरज आहे.

टंचाई काळात भांगकुवाने भागवली तहान
धरणगाव शहरात असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील भरपूर पाणी असलेल्या विहिरींची दूरवस्था झाली आहे. यातीलच एक भांगकुवा नावाने ओळखल्या जाणाºया विहिरीने पाणी टंचाईच्या काळात धरणगावकरांची तहान भागविल्याच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत. सध्या शहरात भीषण पाणी टंचाई आहे. शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.अशावेळी पाण्याच्या विहिरी स्वच्छ करुन त्याचा उपयोग करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

पुरातन काळातीन अनेक विहिरी गाळ व कचºयाने भरल्यामुळे दुर्लक्षित आहे.पाणी टंचाई काळात विहिरींची दूरवस्था दूर करण्याची गरज आहे.पाणी टंचाई निधीतून प्रशासनाकडून मदत घेता येईल. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांसह तहसीलदारांची भेट घेवून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे.
-अंजली भानुदास विसावे, उपनगराध्यक्षा, धरणगाव.

Web Title: The wells of Ahilyabai Holkar era must be preserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.