जळगावात खडसेंना न्याय मिळाला नाही... आम्ही तर कार्यकर्ते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:25 PM2018-07-13T14:25:49+5:302018-07-13T14:27:52+5:30

We could not get justice in Jalgaon ... we were activists .. | जळगावात खडसेंना न्याय मिळाला नाही... आम्ही तर कार्यकर्ते..

जळगावात खडसेंना न्याय मिळाला नाही... आम्ही तर कार्यकर्ते..

Next
ठळक मुद्देभाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापतिकीट कापल्याने नितीन पाटील यांनी व्यक्त केल्या भावनापक्षातील मॅनेजमेंट गुरुंनी आदेश दिल्यास माघार

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी ४० वर्षे काम करणाऱ्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंना पक्षाने न्याय दिला नाही, आम्ही तर सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, आम्हाला पक्ष कसा न्याय देईल. मात्र, आम्हाला पक्षाने कितीही वेळा डावलले तरी पक्ष व पक्षाचा विचारसरणीचा प्रचार करत राहू अशा भावना भाजपचे पदाधिकारी नितीन पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. काल-परवा पक्षात आलेल्या आयात उमेदवारांना पक्षाने संधी दिल्याने नितीन पाटील यांनी पक्षनेतृत्वाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जयश्री पाटील यांनी प्रभाग क्र मांक ७ ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पक्षासाठी आतापर्यंत काम करत आलो आहे व पुढेही काम करत राहील. १७ जुलै पर्यंत अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत असून पक्षाने नेते व आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, संघटन मंत्री किशोर काळकर व पक्षाचे मॅॅनेजमेंट गुरु श्रीकांत व श्रीराम खटोड यांनी जर आदेश दिले तर माघार घेवू अशी माहिती नितीन पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
भाजपाकडून बुधवारी आपल्या ७५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नितीन पाटील यांच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका जयश्री पाटील यांचे नाव ऐनवेळी डावलण्यात आले.
महानगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्यावर कारवाई
भाजपाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे टीका केल्याप्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा जयश्री उमेश पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. याबाबत पक्षातर्फे कळविण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, या बैठकीत आमदार सुरेश भोळे, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र्र पाटील हे उपस्थित होते. जयश्री पाटील यांच्यावर कारवाई केल्यामुळे भाजपाच्या अनेक पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: We could not get justice in Jalgaon ... we were activists ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.