जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर शहरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:54 PM2018-05-22T16:54:54+5:302018-05-22T16:54:54+5:30

जामनेर शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ठिकठिकाणी फुटत असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नगरपालिकेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे

Water supply minister water supply to Jamnar city | जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर शहरात टँकरने पाणीपुरवठा

जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर शहरात टँकरने पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देजामनेर शहरात टँकरद्वारे केला जातोय पाणी पुरवठाभुयारी गटार योजनेच्या कामामुळे जलवाहिनीला गळतीटँकर व शुद्ध पाणी विक्रीचा धंदा जोरात

आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.२२ : शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ठिकठिकाणी फुटत असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नगरपालिकेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
जामनेर शहरात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. खोदकाम करीत असताना काही ठिकाणी जलवाहिनी फुटत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नगरपालिकेचे टँकर आल्यानंतर त्या भागातील नागरिक पाण्यासाठी गर्दी करीत आहेत.
जामनेर शहरात ५०० लिटर पाण्यासाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत. वाघूर धरणावर मंजुर झालेल्या या योजनेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. जामनेर शहरातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेऊन शुद्ध पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय तेजीत आहे. पाणी विक्रीतून जामनेर शहरात प्रतिदिन एक लाखांची उलाढाल होत आहे.

Web Title: Water supply minister water supply to Jamnar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.