पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:48 PM2017-09-19T15:48:04+5:302017-09-19T15:50:13+5:30

चाळीसगाव तालुक्यातील 136 गावांचा संभाव्य कृती आराखडा तयार

Water scarcity will be severe | पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार

पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार

Next
ठळक मुद्देसरपंच, ग्रामसेवकांनी मांडली पाणीटंचाई समस्या सद्य:स्थितीत पाच गावांचा पाणीटंचाईशी सामना 14 पाझर तलाव, आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ठणठणाट

ऑनलाईन लोकमत चाळीसगाव, जि.जळगाव, दि. 19 : तालुक्यात अपूर्ण पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईची समस्या येत्या काळात तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी प्रशासनाने 136 गावातील सरपंच, ग्रमसेवकांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील नदी-नाले, पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलावांमध्ये पूर्णपणे ठणठणाट आहे. डिसेंबरनंतर पाणीबाणी उद्भवणार असली तरी सद्य:स्थितीत पाच गावे टंचाईग्रस्त आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा लवकरच जिल्हाधिका:यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली. आढावा बैठकीला आमदार उन्मेष पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, जि.प. सदस्य, सर्व 14 पं.स. सदस्य, 136 गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत गावनिहाय पाणीपुरवठय़ाची स्थिती जाणून घेण्यात आली. सद्य:स्थितीसह फेब्रुवारी अखेर पाणीटंचाई निर्माण होणा:या गावांचा आराखडय़ात समावेश करण्यात आला असून, कोणत्याही गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनातर्फे हातपंप, विहिरी अधिग्रहण, विहिरी खोलीकरण अशी उपाययोजना करण्यात येणार आहे. तालुक्यातील 27 गावांच्या पाणीपुरवठा योजना गिरणा धरणावर अवलंबून आहे. यंदा धरणात समाधानकारक जलसाठा असल्याने या गावांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका झाली आहे. गिरणामधून आवर्तन सुटल्यानंतर या 27 गावांची तहान भागते. पावसाळ्याच्या तीन महिन्यात दमदार पावसाची हजेरी तुरळक असल्याने विहिरींची पातळी खालावली असून, नदी-नाल्यांचाही घसा कोराडाच आहे. सप्टेंबरअखेर नंतरच पाणीटंचाईच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. यात चिंचगव्हाण, तमगव्हाण, सुंदरनगर, नाईकनगर, कळमडू आदी गावांना सद्य:स्थितीत तीव्र पाणी टंचाईशी दोन हात करावे लागत आहे. बेलदारवाडी, बोढरे, चितेगाव, देशमुखवाडी, दरेगाव, डामरुण, डोण दिगर, कुंझर, पिप्री बु.प्र.चा., सायगाव, तांबोळे बुद्रूक ,खडकी या 12 गावांमध्ये उपाययोजना म्हणून विहीर अधिग्रहण केले जाणार आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पही कोरडे : चाळीसगाव तालुक्यात 14 पाझर तलाव तर आठ लघु पाटबंधारे जलप्रकल्पदेखील कोरडे आहेत. मुंदखेडे, चितेगाव, कोदगाव, वलठाण, जामडी, बाणगाव, वलठाण, हातगाव यांचा समावेश यात समावेश आहे. 109 गावांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडय़ात समावेश

Web Title: Water scarcity will be severe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.