अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 10:39 PM2019-05-05T22:39:42+5:302019-05-05T22:41:42+5:30

गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत्तमंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडूंब भरला.

The water given to the villagers from their fields at Kalmsare in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देहातपंपाचे काम तत्काळ व चांगले केल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे सत्कारकौतुकास्पद : गुरांच्या पाण्याची सोय झाल्याने पशुपालकांमध्ये समाधानग्रामस्थांची सहनशिलतातहसीलदारांनी भर उन्हात गाठले कळमसरे गाव

घनश्यामदास टाक
कळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत्तमंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडूंब भरला. हाळात पाणी पाहून गुरंढोरं दूरवरूनच सैरावैरा धावू लागली अन पशुपालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला.
गावात पाणीटंचाई असल्याने नागरिकांच्या पाण्याची सोय तर कशीतरी होत असताना गुरांना पाणी मिळणे खूपच कठीण होते. ही बाब लक्षात घेता रमेश चौधरी यांनी गुरांसाठी पाणी उपलब करुन दिले.
तहसीलदारांची धडक कार्यवाही
कळमसरे बसस्थानकाच्या मागील न्यू प्लॉट आदिवासी वसाहतीत २० वर्षापूर्वीचे हातपंप नादुरूस्त असल्याची तक्रार हिरालाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापर्यत पोहचविली. तेव्हा रखरखत्या उन्हात देवरे यांनी सेवानिवृत्त अनुभवी तांत्रिक कारागिरासह कळमसरे गाठले.
दोन्ही हातपंप दुरूस्त होऊन पाणी बाहेर पडेपर्यत देवरे स्वत: ठाण मांडून बसल्या. तत्पर व चांगले काम केल्याबद्दल तहसीलदारांनी त्या निवृत्त तांत्रिक कारागिराचा तर ग्रामस्थांनी तहसीलदार देवरे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांनी इतर समस्या मनमोकळेपणाने तहसीलदारांकडे मांडल्या. या समस्यांची लवकरच पूर्तता करण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले.
ग्रामस्थांची सहनशिलता
सतत अवर्षण प्रवण व डार्क झोनमुळे कळमसरे गावाला तीव्र पाणीटंचाई ही नित्याचीच बाब होऊन लोकांच्या अंगवळणी पडली आहे. २२ दिवसांपर्यत पाणी मिळत नाही तरी परिस्थितीशी जुळवून घेतले जाते.
दरम्यान, ग्रामस्थांनी गल्लोगल्ली सामूहिकपणे विंधन विहीर करण्याचा अनोखा प्रयोग करून पाहिला. पण फारसा उपयोग झाला नाही. न्यू प्लॉट वसाहतीत शब्बीर खाटीक हे त्यांच्या विंधन विहीरवरून निम्मे गावास मोफत पाणी पुरवितात तर धरणग्रस्त नवीन पुर्नवसित पाडळसे गाव कळमसरे गावाला पाणी पुरवून मोठे औदार्य दाखवित आहे.
मात्र सुमारे पाच हजार लोकवस्तीचे कळमसरे गाव स्वत:च्या हक्काच्या कायमस्वरूपी मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आतूर आहे.
 

Web Title: The water given to the villagers from their fields at Kalmsare in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.