ग्रामपंचायत निवडणूक, जळगाव जिल्ह्यातील २३६ केंद्रांवर मंगळवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:07 PM2018-02-24T23:07:03+5:302018-02-24T23:07:03+5:30

५८० उमेदवार रिंगणात, आज प्रचार थांबणार

Voting in Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणूक, जळगाव जिल्ह्यातील २३६ केंद्रांवर मंगळवारी मतदान

ग्रामपंचायत निवडणूक, जळगाव जिल्ह्यातील २३६ केंद्रांवर मंगळवारी मतदान

Next

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २४- मंगळवारी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली असून जिल्ह्यात २३६ मतदान केंद्रांवर मतदान होऊन ५८० उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, रविवारी संध्याकाळी प्रचार संपणार असून कर्मचारीही सज्ज झाले आहेत.
जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर १३२ ग्रामपंचायतसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी चिन्ह वाटप होऊन प्रशासनाकडूनही तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २३६ मतदान केंद्र राहणार असून प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी नियुक्त राहणार आहे. रविवारी ईव्हीएम मशिनची सेटिंग व सिलिंग करण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी प्रचार संपून मंगळवारी सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे पाच या वेळेत मतदान होणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होईल.

Web Title: Voting in Gram Panchayat Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.