जळगाव शहरातील विवेकानंद नगरात मध्यरात्री घरांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:57 PM2018-06-12T12:57:22+5:302018-06-12T12:57:22+5:30

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

In the Vivekanand city of Jalgaon city, there is no stone unturned at midnight | जळगाव शहरातील विवेकानंद नगरात मध्यरात्री घरांवर दगडफेक

जळगाव शहरातील विवेकानंद नगरात मध्यरात्री घरांवर दगडफेक

Next
ठळक मुद्दे घरांच्या काचा फुटल्यादोन दुचाकीवरुन आले सहा जण

जळगाव : वाघ नगर परिसरातील विवेकानंद नगरात शनिवारी मध्यरात्री व रविवारच्या पहाटे दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी घरांवर दगडफेक केली. मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे रहिवाशी प्रचंड घाबरले. यात तीन जणांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद नाही.
याबाबत रहिवाशांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री एक वाजता विवेकानंद नगरातील प्लॉट क्र. १ मध्ये केशव लक्ष्मण अमृतकर यांच्या घरावर अचानक दगडफेक झाली. त्यात त्यांच्या खिडकीची काच फुटली तर कारवरही दगड फेकले. त्यानंतर थोड्याच अंतरावर प्लॉट क्र. ५मध्ये मनपा कर्मचारी गोकुळ बाबुराव तायडे यांच्या घरावर दगडफेक झाली. त्यांच्या शेजारी असलेल्या रमेश भिका देशमुख यांच्या घराच्या दरवाजाची बाहेरुन कडी लावून दगडफेक केली.
पोलिसाच्या घराशेजारी दगडफेक
तालुका पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी योगिता पाचपांडे यांच्या घराशेजारीच रमेश देशमुख राहतात. त्यांच्याकडे दगडफेक झाली. ही घटना घडली तेव्हा पाचपांडे यांनीही घराबाहेर येऊन हल्लेखोरांचा शोध घेतला. त्यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गस्तीवरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला, मात्र कोणीच आढळून आले नाही.
दरवाजाला लावली बाहेरुन कडी
दगडफेक करणाºयांनी रमेश देशमुख यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावली. कुलर बंद करुन नंतर दगडफेक केली. काचा फुटल्याने घरातील लोक बाहेर यायला लागले, मात्र दरवाजा बाहेरुन बंद होता. त्यांनी शेजारी राहणाºया सुनील पाटील यांना फोन करुन दरवाजा उघडायला लावला. दरम्यान, या घटनेमुळे विवेकानंद नगर भागात रहिवाशी कमालीचे घाबरलेले आहेत. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी अपेक्षा रहिवाशांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.
नागरिक बाहेर येताच पळाले हल्लेखोर
अमृतकर यांचा मुलगा नरेंद्र, गोकुळ तायडे व देशमुख यांच्या कुटुंबातील सर्व लोक बाहेर आल्यानंतर दोन दुचाकीवरुन सहा जण पळून जाताना दिसले. या तरुणांनी दगडफेक का? केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीही या भागात दगडफेक झाली होती. वाळूची वाहने या भागातून जात असल्याने त्यांच्या समर्थकांनी दगडफेक केली असावी अशीही शक्यता आहे, किंवा इतर कोणीतरी दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक केली असावी असाही अंदाज आहे.

 

Web Title: In the Vivekanand city of Jalgaon city, there is no stone unturned at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.