सरण रचून आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आले मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:56 PM2018-07-17T19:56:14+5:302018-07-17T19:59:42+5:30

दुस-याचे सरण रचून अंत्ययात्रा आटोपून घरी परतणाºया पशुवैद्यकीय अधिकाºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जानवे येथे घडली

veterinary officer death in janve | सरण रचून आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आले मरण

सरण रचून आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आले मरण

googlenewsNext
ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील जानवे येथील घटनाश्रद्धांजली अर्पण केल्यानंतर काही मिनिटात मृत्यूदवाखान्यात डॉक्टरांनी केले मृत घोषित

अमळनेर- दुस-याचे सरण रचून अंत्ययात्रा आटोपून घरी परतणाºया पशुवैद्यकीय अधिकाºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जानवे येथे घडली
दीपक भास्कर पाटील (वय ४६ रा.जानवे ता अमळनेर) हे कुरवेल ता चोपडा येथे पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. १७ रोजी ते जानवे येथे एक वृद्धेच्या अंत्ययात्रेला आले असता त्यांनी तेथे सरण रचणे पासून सर्व मदत केली. श्रद्धांजली वाहून परतताना अवघ्या ५०० मीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना गावकºयांनी तत्काळ डॉ.बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई , वडील, पत्नी , भाऊ , मुलगा , मुलगी असा परिवार आहे.

Web Title: veterinary officer death in janve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.