भुसावळात राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:47 PM2019-05-21T17:47:09+5:302019-05-21T17:48:24+5:30

माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Various programs for the occasion of Rajiv Gandhi's death anniversary | भुसावळात राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

भुसावळात राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

Next
ठळक मुद्देशहर काँग्रेसतर्फे पाणी वाटपतालुका काँग्रेसतर्फे प्रतिमा पूजनराजीव गांधींच्या स्मृतींना उजाळा

भुसावळ, जि.जळगाव : माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यादरम्यान राजीव गांधींच्या स्मृतींना कार्यकर्त्यांनी उजाळा दिला व त्यांच्या कार्याची माहिती दिली.
शहर काँग्रेसतर्फे पाणी वाटप
भुसावळ शहरामध्ये मागील चार महिन्यापासून नागरिकान्ाां पालिकेकडून एक महिन्यानंतर पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त गरिबांना मोफत पाणी व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, उपाध्यक्ष संतोष सालवे, विलास खरात, सरचिटणीस शैलेश अहिरे, शैलेंद्र नन्नवरे, कलिम बेग, पी.आर.पी. नेते राजू डोगरदिवे, अजगरभाई, आकाश विरघट, सोनू विरघट, सलिम भाई, सलीम गवळी, अनवर तडवी, युनूस मिर्झा आदी पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.
भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. उपस्थितांनी राजीव गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी पक्षाचे भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील, तालुका उपाध्यक्ष राजू पालीमकर, ज्ञानेश्वर पाटील, मनोज देशमुख, शहराध्यक्ष अश्फाक काझी, राहुल जव्हरे, पप्पू काझी, जयंत शुरपाटणे, मनोज चव्हाण, भौसे, जितेंद्र राणे, गजू देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Various programs for the occasion of Rajiv Gandhi's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.