यावल येथे महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमेला विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:08 PM2019-07-14T18:08:36+5:302019-07-14T18:09:18+5:30

महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

Various programs of Guruparnimela at Maharishi Vyas temple at Yaval | यावल येथे महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमेला विविध कार्यक्रम

यावल येथे महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमेला विविध कार्यक्रम

googlenewsNext

यावल, जि.जळगाव :   महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्त्व
अध्यात्मिक क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्व आहे. या परंपरेत महर्षी व्यास गुरूंच्या अग्रस्थानी आहेत. महर्षी व्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते. असे म्हणतात की, ‘व्यासोच्छीट जगत सर्व।’ (अर्थात जगातील कोणत्याही ज्ञानाची जाणीव सर्वप्रथम महर्षी व्यासानाच होते.) महर्षी व्यास हे गुरूंचे प्रतिनिधी आहेत. चार वेद, १८ पुराण व महाभारत रचयिते महर्षी व्यासांचे येथे भव्य मंदिर असून, गुरूपोर्णिमेस मोठा उत्सव साजरा केला जातो.
आख्यायिका
महाभारत रचयिते श्री महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची दंतकथा आहे. महाभारत काळात सातपुड्याचे घनदाट जंगल यावलपर्यंत होते, असे सांगितले जाते. सध्याच्या येथील हडकाई-खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरीता-सरीता नद्या होत. या नद्यांच्या संगमानंतर वाहत असलेली सुर नदी ही दक्षिण वाहिनी आहे. याच नदीच्या उंच टेकडीवर लोमेश नावाच्या ऋषींंचा आश्रम होता. एकदा लोमेशांनी महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ आयोजित केला होता. त्याचवेळेस अज्ञानवासातून पांडव हस्तीनापुराकडे परतताना लोमेश ऋषींच्या आश्रमावर आले असता त्यांच्या हस्ते लोमेशांनी महर्षीना यज्ञासाठी निमंत्रित केले होते व महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ पार पडला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षींनी काही काळ येथील भूमीत वास्तव्य केल्याचे व महाभारताची काही पर्वे लिहिली असल्याचे म्हटले जाते. महर्षी व्यास हे सप्त चिरंजिवापैकी एक होत. चिरंजीवी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. भारतात महर्षी व्यासांचे मुख्य स्थान बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर यावल येथेच असल्याने जिल्ह्यातील भाविक येथे गुरूपौर्णिमेस येवून गुरूंच्या चरणी लीन होतात.
मंगळवारी गुरूपौर्णिमेनिमित्ताने महर्षी व्यास मंदिरात संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन आयोजित केले आहेत. महापूजेस सकाळी आठला प्रारंभ होईल. यात्रेनिमित्ताने मंदिर परीसरात माधवराव गोळवलकर रक्तपेढी व संस्थेतर्फे रक्तदान शिबिर तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

Web Title: Various programs of Guruparnimela at Maharishi Vyas temple at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.