वरखेडे-लोंढे प्रकल्प जूनमध्ये पूर्ण होणार- गिरीश महाजन यांनी चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवात दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:38 AM2018-11-04T00:38:01+5:302018-11-04T00:39:34+5:30

वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.

Varakhade-Londhe project to be completed in June- Girish Mahajan gave assurance to Chalisa Nagar Panchayat Shatabdi Festival | वरखेडे-लोंढे प्रकल्प जूनमध्ये पूर्ण होणार- गिरीश महाजन यांनी चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवात दिली ग्वाही

वरखेडे-लोंढे प्रकल्प जूनमध्ये पूर्ण होणार- गिरीश महाजन यांनी चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवात दिली ग्वाही

Next
ठळक मुद्देनार-पार योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूदडास मुक्त चाळीसगाव शहराचा संकल्प७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

चाळीसगाव, जि.जळगाव : वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.
शनिवारी सायंकाळी सात वाजता गिरीश महाजन यांच्या हस्ते चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उन्मेष पाटील होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, चाळीसगावच्या उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, मंगेश चव्हाण, घृष्णेश्वर पाटील, रमेश चव्हाण, श्यामलाल कुमावत यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
गिरणा नदीतील पाणी मन्याड धरणात टाकण्याची मागणी असो की, नदीजोड प्रकल्प, दुष्काळामुळे पाण्याची तीव्रता अधोरेखित झाली आहे. गिरणेवरील बलून बंधाºयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. पाणी जपून वापरा, असे संदेश देतानाच गिरीश महाजन यांनी स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही नमूद केले.
उन्मेष पाटील यांचे मनोगत
चाळीसगाव शहराचा डीपीआर मंजूर करून ७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होत आहे. पुढच्या काळात डासमुक्त चाळीसगाव शहरासाठी भूयारी गटार कार्र्यान्वित करण्याचा प्रस्ताव केला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दहा शहरांमध्ये चाळीसगावची गणना व्हावी, असे नियोजन पालिकेमार्फत केले जात असल्याचे सांगून आमदार उन्मेष पाटील गत पंधरा महिन्यात पालिकेने राबविलेल्या उपक्रमांचा आढावाही मांडला. मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी १०० कोटी रुपये निधी देण्याचे अश्वासन पूर्ण केले असून नविन ३४६ कोटी रुपयांच्या कामांचेही आज भूमिपूजन झाल्याचे त्यांनी सांगितले.
आशालता चव्हाण, राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छाग्रह प्रकल्प व घंटागाड्या, जेसीपी यांचे लोकार्पण, शताब्दीच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्र्थींना आदेशाचे वितरणही केले गेले. प्रास्ताविक मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी, तर सूत्रसंचालन मनोहर आंधळे व अर्जुन परदेशी यांनी केले. आभार दिगंबर वाघ यांनी मानले.





 

Web Title: Varakhade-Londhe project to be completed in June- Girish Mahajan gave assurance to Chalisa Nagar Panchayat Shatabdi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.