वाणेगाव ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:45 PM2018-10-21T22:45:17+5:302018-10-21T22:47:05+5:30

वाणेगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे.

Vanegaon gram panchayat order cancellation order canceled | वाणेगाव ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश रद्द

वाणेगाव ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश रद्द

Next
ठळक मुद्देनाशिक विभागीय आयुक्तांनी दिला होता बरखास्तीचा निर्णयऔरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्तांचा आदेश केला रद्दचार ग्रामपंचायत सदस्यांना २५ हजारांचा दंड

पाचोरा- वाणेगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यामुळे सरपंच सिंधुबाई प्रकाश पाटील यांना पुन्हा सरपंचपद मिळणार आहे. तर चार ग्रा.पं.सदस्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
वाणेगाव ग्रा.पं.च्या ७ पैकी ४ सदस्यांनी राजीनामे देऊन ग्रा पं बरखास्त करण्याचे अपील विभागीय आयुक्तांकडे केले होते. त्यानुसार आयुक्तांनी ग्रा.पं.बरखास्त करून निवडणूक घेण्यात आली. याविरोधात सरपंच सिंधुबाई पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. यावर सुनावणी होऊन खंडपीठाने विभागीय आयुक्तांचा निर्णय रद्द ठरविला. २७ मे रोजी घेतलेली निवडणूक रद्द ठरवित ग्रा पं सदस्या प्रतिभा पाटील, ज्योती पाटील, अफशना तडवी, अजय संसारे या सदस्यांना २५ हजारांचा दंड ठोकला. ३ मे २०१६ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. सरपंच सिंधुबाई पाटील यांना पुन्हा पदभार घेतला. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. महेश देशमुख यांनी काम पाहिले.

Web Title: Vanegaon gram panchayat order cancellation order canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.