वाकोदच्या भाजी बाजारात कोथिंबीर २०० तर टोमॅटो ९० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 07:00 PM2017-11-04T19:00:32+5:302017-11-04T19:07:34+5:30

भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील गणित बिघडले

In vakod cilantro 200 and Tomato 90 kg | वाकोदच्या भाजी बाजारात कोथिंबीर २०० तर टोमॅटो ९० रुपये किलो

वाकोदच्या भाजी बाजारात कोथिंबीर २०० तर टोमॅटो ९० रुपये किलो

Next
ठळक मुद्देगेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याचे भाव जादाभाजीपाल्याचे भाव वाढल्याने आर्थिक गणित बिघडलेमहागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त

आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर : भाजीला चव देणारी कोथिंबीर २०० रुपये आणि सलादसह विविध भाज्यांची चव वाढविणाºया टोमॅटोचे भाव किलोसाठी ९० रुपये झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे.
वाकोद येथे शनिवारच्या बाजारात भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आला होता. काही दिवसांपूर्वी २० ते ३० रुपये किलो दराने मिळणारी भाजी वाकोद येथे शनिवारच्या बाजारात दुप्पट ते तिप्पट भावाने मिळत आहे. बाजारात सध्या दर्जा नुसार कोथिंबीर ही १५० ते २०० रुपये तर टोमॅटो ८० ते ९० रुपये दराने विक्री होत आहे. कांदे ५० रुपये, पालक ६० , मेथी ७० , भरीत वांगे ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. यासह फूल कोबी, पत्ता कोबी, भेंडी, चवळी शेंग, वांगे यासह अनेक पाल्यभाज्याचे दर जादा असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील गणित विस्कळीत झाले आहे.

Web Title: In vakod cilantro 200 and Tomato 90 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.