जळगावात पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 05:22 PM2018-04-19T17:22:19+5:302018-04-19T17:22:19+5:30

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर करण्याचा प्रयत्न करणा-या मदन महाजन डेडवाल (वय २१ रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) या तरुणाला गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले. मदन याला मदत करणारा रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) हा तरुण फरार झाला आहे.

Use of Cordless Year phone for written examination in Jalgaon |  जळगावात पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर

 जळगावात पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर

Next
ठळक मुद्देतोतयेगीरीचा प्रयत्न फसला   औरंगाबादच्या तरुणाला अटक दुसरा साथीदार फरार

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१९ : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर करण्याचा प्रयत्न करणा-या मदन महाजन डेडवाल (वय २१ रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) या तरुणाला गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले. मदन याला मदत करणारा रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) हा तरुण फरार झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून गुरुवारी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सात वाजता प्रत्यक्ष पेपर सुरु होणार असला तरी साडे पाच वाजेपासून उमेदवारांना बोलावण्यात आले होते. प्रत्येक उमेदवारांची अंगझडती घेतल्यानंतर डोअर फ्रेम मेटर डिटेक्टरमधून तपासणी केल्यानंतर मैदानावर पेपरसाठी सोडले जात होते. तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, कॉन्स्टेबल विजय कचरे व अशपाक शहा यांची गेट क्र.१ वर ड्युटी होते. पावणे सात वाजता मदन डेडवाल हा तरुण घाईगडबडीत धावत आला व गेटवर असलेल्या पोलिसांशी पूर्ण तपासणी न होऊ देता घाई करुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करु लागला तेव्हा त्याचे बींग फुटले. मदन याची अंगझडती घेतली असता उजव्या हाताच्या दंडावर काही तरी कडक व चौकोनी वस्तू जाणवली. शर्ट काढल्यानंतर एक कॅलक्युलेटरसारखे चिकटपट्टीने चिकटविलेले इलेक्ट्रॉनिक यंत्र आढळून आले. या यंत्रात मोबाईलचे सीमकार्ड होते. तर कानात कॉडलेस इअर फोन आढळून आला. हे यंत्र अतिशय बारीक असून लक्षात येण्यासारखे नाही.

Web Title: Use of Cordless Year phone for written examination in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.