जळगावात टारगट तरुणांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:27 PM2018-01-20T12:27:04+5:302018-01-20T12:29:12+5:30

एकलव्य क्रीडा संकूलाच्या प्रवेशव्दाराजवळील घटना

Two youths drifter assault on youth in Jalgaon | जळगावात टारगट तरुणांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण

जळगावात टारगट तरुणांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देपोलीस आल्याने मारहाण करणारे पसाररस्त्यावरील ये-जा करणा-यांनाही दिली धमकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटल चौक परिसरातील एकलव्य क्रीडा संकूलाच्या प्रवेशव्दाराजवळ शुक्रवारी दुपारी 1 वाजता दुचाकीवर  आलेल्या सात जणांच्या टोळक्याकडून दोन युवकांना बांबूच्या काठय़ांनी बेदम मारहाण झाली. पोलीस येताच मारहाण करणारे व ज्यांना मारहाण झाली ते युवक देखील पसार झाले. 
गेल्या काही दिवसांपासून शहरात टारगट तरुणांचा धुमाकूळ वाढला आहे. कधी मुलींची छेड काढण्यावरुन तर कधी शुल्लक कारणामुळे वाद होत आहेत. त्यामुळे टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 
शाब्दीक वादानंतर मारहाण
एकलव्य क्रीडा संकूलच्या  प्रवेशव्दाराजवळ शुक्रवारी दोन युवक उभे होते. अचानक चार मोटारसायकलवर लाठय़ा काठय़ा घेवून आलेल्या सात जणांनी प्रवेशव्दारावर उभ्या असलेल्या युवकांशी शाब्दिक वाद घातला. त्यापैकी एका युवकाने प्रवेशव्दारापासून पडण्याचा प्रय} केला असता, टोळक्यातील      युवकांनी दोघं युवकांना मारहाण करण्यास सुरवात केली. बांबूच्या काठय़ांनी दोन युवकांना बेदम मारहाण होत असल्यामुळे शेजारी उभ्या असलेल्या विद्याथ्र्यानी घटनास्थळावरुन पळ काढला. यामुळे एकलव्य क्रीडा संकूल परिसरात काही काळ गोंधळ उडालेला होता. 
रस्त्यावरील ये-जा करणा-यांनाही दिली धमकी
दोघं युवकांना मारहाण होत असताना, भुषण कॉलनी व महामार्गाकडे जाणा:या काही नागरिकांनी आपल्या गाडय़ा थांबविल्या होत्या. मात्र टोळक्यातील काही युवकांनी उभ्या असलेल्या नागरिकांना देखील  काठय़ांचा धाक दाखवून घटनास्थळावरुन जाण्याची धमकी दिली.  तसेच मारहाण होत असलेले तरुण मारहाण करु नका अशा विनवण्या करीत होते. तरी देखील दहा ते पंधरा मिनीटे त्यांना मारहाण झाली.
पोलीस येत असल्याचे समजताच मारहाण करणारे टारगट तरुण पसार झाले. या वादाचे नेमके कारण  कळू शकले नाही. तसेच या प्रकरणी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल नाही. 

Web Title: Two youths drifter assault on youth in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.