ट्रकच्या धडकेत सामनेरचे दोघे दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:54 PM2018-06-24T23:54:53+5:302018-06-24T23:55:35+5:30

Two wheelers in front of the truck were injured in the truck | ट्रकच्या धडकेत सामनेरचे दोघे दुचाकीस्वार जखमी

ट्रकच्या धडकेत सामनेरचे दोघे दुचाकीस्वार जखमी

Next

जळगाव : लग्नाचे व-हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोपान लुभान भिल (२४), भोला सुकदेव भिल (२२), दोघे रा. सामनेर, ता. पाचोरा हे दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पाथरी-सामनेर दरम्यान झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन उपचार सुरू आहे.
सोपान भिल व भोला भिल हे दोघे जण दुचाकीने बिलवाडी येथे लग्नाला गेले होते. तेथून ते परतत असताना पाथरी-सामनेर दरम्यान समोरुन लग्नाचे वºहाड घेऊन येणाºया ट्रकने (क्र. एचएच २०, एए - ९१३१) दुचाकीस जोरदार धडक दिली व चालक वाहनासह फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच सामनेर येथील गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली व १०८ रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र एकही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले, असे सामनेरचे उपसरपंच महेश पाटील यांनी सांगितले. अखेर महेश पाटील, अनिल भिल, गणेश पाटील व इतर गावकºयांनी रस्त्याने जाणाºया एका मालवाहू वाहनास थांबविले व त्यातून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले.
दोघांच्या पायाला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर ट्रक फरार झाला त्या वेळी पाथरी येथील गावकºयांनी त्याचा क्रमांक नोंदवून घेतल्याची माहिती मिळाली.

Web Title: Two wheelers in front of the truck were injured in the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.