रिव्हॉल्वर चोरी प्रकरणात दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:27 AM2019-01-11T11:27:03+5:302019-01-11T11:27:32+5:30

 कर्तव्यात कसूर केल्याचा राखीव निरीक्षकांवर ठपका

 Two policemen suspended in the revolver case | रिव्हॉल्वर चोरी प्रकरणात दोन पोलीस निलंबित

रिव्हॉल्वर चोरी प्रकरणात दोन पोलीस निलंबित

Next
ठळक मुद्देचौकशी अहवालात ठेवला ठपका


जळगाव : पोलीस वर्धापन दिनानिमित्त काव्यरत्नावली चौकात आयोजित शस्त्र प्रदर्शनातून रिव्हॉल्वर चोरी झाल्याच्या प्रकरणात पोलीस नाईक विजय अभिमन शिंदे व कॉ. योगेश श्रीराम मासरे या दोन जणांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. तसेच राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांचा कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
पोलीस वर्धापनदिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत काव्यरत्नावली चौकात शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात टेबल क्रमांक ४ वर विजय शिंदे यांची तर टेबल क्रमांक १ वर योगेश मासरे यांना नेमण्यात आले होते. दोन्ही टेबलवर प्रत्येकी तीन शस्त्र होते.
दोन्ही कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणाला जाताना तेथे दुसºया कर्मचाºयाची नियुक्ती केली नाही तसेच पूर्वपरवानगीने टेबल सोडला होता व त्याच वेळी ३८ स्ट्रम रुगल हे रिव्हॉल्वर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
सहायक पोलीस अधीक्षकांकडे चौकशी
शिंदे व मासरे या दोघांवर कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांचाही हलगर्जीपणा निष्पन्न झाला आहे. त्यामुळे त्यांचाही कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी आता सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती अधीक्षक शिंदे यांनी दिली. दरम्यान, या घटनेला आठवडा झाला तरी अद्यापही रिव्हॉल्वर सापडलेले नाही.
चौकशी अहवालात ठेवला ठपका
रिव्हॉल्वर चोरी झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस व उपअधीक्षक (गृह) यांच्यामार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु होती. त्यात शिंदे व मासरे यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा चौकशी अहवाल उपअधीक्षकांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी दोघांना निलंबित केले.
पाचोºयाचे डी.एम.पाटील यांच्याजवळ पुणे विमानतळावर आढळली २२ काडतुसे
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भाजप कार्यकर्ते दिलीप मुकुंदराव पाटील उर्फ डी.एम.पाटील (रा.पाचोरा) यांच्या बॅगेत गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजता पुणे विमानतळावर तब्बल २२ काडतुसे आढळून आली. याच वेळी आणखी एका प्रवाशाजवळही दोन काडतुसे आढळून आली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे, असे असताना प्रवाशांच्या साहित्यात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
डि.एम. पाटील हे पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजने बंगळुरुला गुरुवारी जाणार होते़ त्यांच्याकडील साहित्याची तपासणी करीत असताना त्यांच्या बॅगेत २२ काडतुसे आढळून आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना आढळून आला.
४नजर चुकीने हे २२ काडतुसे आल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. त्यांच्याकडे केवळ काडतुसे होती,रिव्हॉल्व्हर नव्हते. दुसरे प्रवासी भगवान चरणसिंह (वय ६०) हे पुण्याहून दिल्लीला जाणार होते. त्यांच्याही सामानात त्याच दरम्यान २ काडतुसे आढळून आली. त्यांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.जळगाव पोलिसांशी संपर्क
४ पुणे विमानतळ पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून पाटील यांच्याबाबत माहिती घेतली. राजकीय व शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत असून गुन्हेगारीशी त्यांचा संबंध नसल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना विचारले असता पुणे पोलिसांकडून काहीच विचारणा झाली नसल्याचे सांगितले.

Web Title:  Two policemen suspended in the revolver case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.