खान्देशातील दोन महाविद्यालयांनीच पूर्ण केले ‘नॅक’ मूल्यांकनाचे तीसरे सर्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 9:48pm

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील जळगाव-दि.१०-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महाविद्यालयांना शासनाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर ५ वर्षात ‘नॅक’कडून महाविद्यालयांचे मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. राष्टÑीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) या संस्थेकडून महाविद्यालयांची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया सुविधा, वर्षभर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम याव्दारे महाविद्यालयांना मानांकन दिले जाते. मानांकनानुसार महाविद्यालयांना शासनाकडून अनुदान दिले जाते. खान्देशात महाविद्यालयांना नॅकची तपासणी करून घेण्याबाबत सहसंचालकांकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालयांमध्ये नॅक समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयांची तपासणी पूर्ण केलीहोती.

२ महाविद्यालयांनी अद्याप केले नाही मूल्यांकन खान्देशातील ८३ पैकी ८१ अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले असले तरी अद्याप २ महाविद्यालयांनी नॅकचे पहिले सर्कल देखील पूर्ण केलेले नाही. यामध्ये धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पी.बी.बागल महाविद्यालय व अक्कलकुवा येथील रुरल महाविद्यालयाचा समावेशअसल्याचीमाहितीडॉ.तुपेयांनीदिली.

५५ महाविद्यालयांनी पूर्ण केले दोन सर्कल प्रत्येक महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन तपासणी समितीकडून तीन सर्कल पूर्ण करून घ्यायवयाचे असतात. खान्देशातील ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे सर्कल पूर्ण केले असून, त्याआधारावर महाविद्यालयांना मूल्यांकन देण्यात आले आहे.२८ महाविद्यालयांनी अद्याप दुसरे सर्कल पूर्ण केलेले नाही. तर केवळ दोन महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले आहे. यामध्ये भुसावळ येथील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाने २०१५ मध्ये सर्कल पूर्ण केले. तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने गेल्याच महिन्यात हे सर्कल पूर्ण करून ‘ए प्लस’ चे मानांकन प्राप्त केलेआहे.

ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम १.‘नॅक’ समितीकडून महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणी केल्यानंतर अ किंवा ब मानांकन मिळविणाºया महाविद्यालयांमध्ये शहरी भागातील महाविद्यालयांचा समावेश मुख्यत्वेकरून आहे. नॅकचे मानांकन ठरविताना महाविद्यालयाकडून दिल्या जाणाºया सुविधा पाहताना ग्रामीण भागातील महाविद्यालय व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम आहे.

२. यामुळे ग्र्रामीण भागातील महाविद्यालये नामांकन मिळविण्यास कमी पडतात अशी तक्रार काही महाविद्यालयांकडून होत आहे. तपासणी करत असताना ज्या महाविद्यालयात इतर राज्यातील किंवा परदेशातील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील महाविद्यालय कमी पडत असल्याची तक्रार ग्रामीण भाागातील महाविद्यालयांची आहे.

कोट.. आतापर्यंत २ महाविद्यालयांनी नॅक समितीकडून करण्यात येणाºया तपासणीचे तिसरे सर्कल पूर्ण केले आहे. लवकरच तीन सर्कल पूर्ण करणाºया महाविद्यालयांची संख्या महिनाभरात वाढेल. तसेच ज्या दोन महाविद्यालयांनी अद्याप नॅकचे पहिले सर्कल पूर्ण केले नाही. त्या महाविद्यालयांमध्ये देखील लवकरच नॅक समितीकडून तपासणी केली जाणार आहे. नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. -डॉ.केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग

संबंधित

खडसे परिवाराची बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणा-या नगरसेवकाला अटक
विवाहबाह्य संबंधामुळे ५०० संसार उघड्यावर; पती-पत्नीच्या मित्र मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप
कुठलेही प्रशिक्षण न घेता जळगावच्या महिला उद्योजकांची गगन भरारी
लष्करात नोकरीच्या आमिषाने ७ कोटींचा गंडा, पोलिसांनी केली अटक
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शासनाचा निषेध

जळगाव कडून आणखी

जळगावात अग्नीतांडव, पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासह १४ घरे जळून खाक, सहा बक-या, २० कोंबड्या होरपळून मृत्यूमुखी
खान्देशकन्येच्या प्रतिभेला मानाचा सालाम, चाळीसगावच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रात आनंदी सूर
‘मॅसॅकर आॅफ द इनोसंट्स’ : रुबेन्स
आवक वाढल्याने गव्हाच्या भावात १०० रुपयांनी घसरण
...अन् तो फलक पुन्हा सन्मानाने उभा राहणार

आणखी वाचा