प्राणघातक हल्ला प्रकरणात अडीच वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:21 PM2019-05-09T18:21:08+5:302019-05-09T18:22:58+5:30

शेतात जाणा-या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी प्रभाकर दशरथ पाटील (६६, रा.घुमावल, ता.चोपडा) याला न्यायालयाने गुरुवारी अडीच वर्ष सश्रम कारवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी हा निकाल दिला. दरम्यान, या खटल्यात अनेक महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते हे विशेष !

Two-and-a-half years imprisonment in the assault case | प्राणघातक हल्ला प्रकरणात अडीच वर्ष कारावास

प्राणघातक हल्ला प्रकरणात अडीच वर्ष कारावास

Next
ठळक मुद्देन्यायालयाचा निकाल  अनेक महत्वाचे साक्षीदार फितूर

जळगाव : शेतात जाणा-या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी प्रभाकर दशरथ पाटील (६६, रा.घुमावल, ता.चोपडा) याला न्यायालयाने गुरुवारी अडीच वर्ष सश्रम कारवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी हा निकाल दिला. दरम्यान, या खटल्यात अनेक महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते हे विशेष !
या गुन्ह्यातील फिर्यादी सुधाकर रतन पाटील हे १६ आॅक्टोबर २००८ रोजी सोनवद, ता.धरणगाव येथील त्यांच्या शेतात बैलगाडीने जात असताना त्यांचा मुलगा प्रभाकर व कृष्णा समोरुन येत होते. त्यावेळी प्रभाकर दशरथ पाटील याने प्रभाकर सुधाकर पाटील याला अडवून डोक्यात मागील बाजुस सुºयाने गंभीर दुखापत केली तर योगराज दशरथ पाटील याने कृष्णा आनंदा पाटील याला सळईने मानेवर तर मृत आरोपी तानकु दौलत पाटील याने कुºहाडीने सुपडू पाटील व माधवराव पाटील यांना डोक्यावर, पायावर व खांद्यावर मारुन दुखापत केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
जखमीनेच दिली साक्ष
तपासाधिकारी आर.बी.देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारतर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन या खटल्यात फक्त जखमी साक्षीदार प्रभाकर सुधाकर पाटील यानेच आरोपीविरुध्द साक्ष दिली. इतर साक्षीदार फितूर झाले. इतर साक्षीदार गजानन पोपट सावंत, आत्माराम बंडू भोई, वैद्यकिय अधिकारी डॉ.अरविंद वानखेडे, डॉ.मिलिंद कोल्हे व तपासाधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपी प्रभाकर पाटील यास कलम ३२६ अंतर्गत दोषी धरण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.संभाजी जाधव व अ‍ॅड.निलेश चौधरी यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.हिंमत सूर्यवंशी यांनी कामकाज चालविले.

Web Title: Two-and-a-half years imprisonment in the assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.