चाळीसगावात शतकोत्तर शाळेचा होतोय कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:27 PM2019-05-25T16:27:48+5:302019-05-25T16:28:55+5:30

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणा-या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयाचा माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या सढळ सहभागाने विकासकामे करुन विद्यालयास परिसराचे रुपडे आकर्षक केले जात आहे.

Turning to Centennial School in 40 School | चाळीसगावात शतकोत्तर शाळेचा होतोय कायापालट

चाळीसगावात शतकोत्तर शाळेचा होतोय कायापालट

Next
ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांचाही हातभारचाळीसगावच्या आ.बं. विद्यालयाचे खुलले रुपडे

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणा-या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयाचा माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या सढळ सहभागाने विकासकामे करुन विद्यालयास परिसराचे रुपडे आकर्षक केले जात आहे. संस्थेच्या व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयासही रंगरंगोटी व इतर सुविधा साकारल्या जात आहे. व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विविध विभागांमध्ये विकास कामे सुरु झाली आहेत.
चाळीसगाव शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ १९०९ मध्ये रोवली गेली. शाळेच्या इमारतीला ११० वर्ष झाली असून ऐतिहासिक ठेवा म्हणून तिची डागडुजी करण्यास रंगकामही करण्यात येत आहे. याबरोबरच प्रत्येक वगार्चे सुबक नूतनीकरण केले जात आहे.
गेल्या ५१ वर्षांपासून नारायणदास अग्रवाल यांचा संस्था व्यवस्थापन मंडळात सहभाग राहिला आहे. गेल्या काही वर्षापासून संस्थेचे नेतृत्व ते करीत असून एकुच सस्थेच्या विकासाला यामुळे चालना मिळाली आहे.
जीर्ण झालेले पत्रे बदलवून नवीन पत्रे बसवणे, स्वच्छ आणि स्वतंत्र शौचालयासाठी २४ तास पाण्याची व्यवस्था, शौचालयात पेव्हर ब्लॉक बसविणे, शिक्षकांसाठी स्टाफ रुमचे नूतणीकरण अशी कामे पूर्णत्वास गेली आहेत.
प्रखर ऊन्हामधेदेखील शाळेतील ग्राऊंडला पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच जुन्या ब्लॉकस वॉश करून कलरींग करण्यात येत आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रसन्न वातावरण, शुध्द आहारबरोबरच स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आर.ओ.प्लाँट बसविण्यात येत आहे. ६३ वर्षांची परंपरा असणाऱ्या व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयाचेही सुशोभीकरण केले जात आहे. संस्थेच्या बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल, कळंत्री प्राथ.विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपुत, आ. बं. गर्ल्स हायस्कूलचे चेअरमन अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, ज्येष्ठ संचालक मु.रा.अमृतकार, व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र चौधरी यांच्यासह संचालक मंडळ परिश्रम घेत आहे.

चाळीसगाव शिक्षण संस्थेला ११० वर्षांची मोठी शैक्षणिक परंपरा आहे. संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक प्राप्त करुन ठसा उमटवला आहे. ११० वर्ष जुनी शालेय इमारत आम्ही ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन व संवर्धन करीत आहोत. संस्थेच्या इतर विभागांमध्येही विकास कामे होत आहे.
- योगेश रमेशचंद्र अग्रवाल
चेअरमन, बांधकाम समिती, चाळीसगाव शिक्षण संस्था

Web Title: Turning to Centennial School in 40 School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.