बियाणे खरेदीच्या वेळेची चूक पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:34 PM2018-05-27T12:34:51+5:302018-05-27T12:34:51+5:30

दखल घेणे गरजेचे

The time of purchase of seeds can be a mistake | बियाणे खरेदीच्या वेळेची चूक पडू शकते महागात

बियाणे खरेदीच्या वेळेची चूक पडू शकते महागात

Next
ठळक मुद्देअन्यथा नुकसान भरपाईस होणार अडचणदक्ष राहणे गरजेचे



:
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - बियाणे खरेदी करताना झालेल्या एखाद्या चुकीमुळे शेतकऱ्यास नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ येवू शकते. या बाबीचा विचार करता प्रत्येक शेतकºयाने बियाणे खरेदी करताना दक्ष राहणे गरजेचे आहे.
नैसर्गिक आपत्ती, पिक विमा योजना तसेच पिकांवर रोग पडणे आदींसाठी शेतकºयांना नुकसान भरपाई मिळत असते. मात्र किरकोळ गोष्टींची दखल न घेतल्यास भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ शेतकºयांवर येते. हे टाळण्यासाठी शेतकºयांनी सुरुवातीपासूनच विविध गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
...अशा येतात अडचणी
बºयाचदा वडिलांच्या नावावर शेती असते आणि मुलगा बियाणे घेण्यास गेला असता तो स्वत: च्या नावावर बिल घेतो.
कोणत्याही कारणाने नुकसान भरपाई मिळवताना हे बिल ग्राह्य धरले जात नाही. नुकसान भरपाईच्या वेळी बियाणांचे रिकामे पाकीटही पाहिले जाते. परंतु बियाणे वापरल्यावर पाकीट फेकले जाते आणि भरपाई मिळवताना अडचण येते.
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
१) अधिकृत दुकानातून अधिकृतच बियाणे खरेदी करावे. २) बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. ३) ज्याच्या नावार सातबारा उतारा आहे त्याच्याच नाववर बिल घ्यावे.४) बिल आणि बियाणे पाकिटाचे रिकामे रॅपरही पीक हाती येईपर्यंत सांभाळून ठेवावे.

Web Title: The time of purchase of seeds can be a mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.