Thriller ... Three people knife attack on the 10th Century examination center at Bainond | थरारक... बामणोद येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावरच तीन जणांवर चाकू हल्ला

आॅनलाइन लोकमत
यावल /फैजपूर, जि. जळगाव, दि. ८ - यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास थेट चाकू हल्ला होऊन तीन जण जखमी झाले. या घटनेने परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमींमध्ये सौरभ कोळी, सचिन कोळी, सागर कोळी, सर्व रा. बामणोद या बाहेरून आलेल्या तरुणांचा समावेश आहे. 
दहावीच्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालक व इतर मित्र आल्याने गर्दी झाली. यामध्ये लोटालोटी होऊन एकाने चाकू काढला व हल्ला केला. यामध्ये तीन जण जखमी झाले.


Web Title: Thriller ... Three people knife attack on the 10th Century examination center at Bainond
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.