जळगाव येथे दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तीन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:54 PM2018-06-30T12:54:13+5:302018-06-30T12:54:35+5:30

भर वर्दळीतील घटना

Three lakhs worth of two-wheelers from Jalgaon | जळगाव येथे दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तीन लाख

जळगाव येथे दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले तीन लाख

Next

जळगाव : दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत करून त्याच्या डिक्कीतून तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी जळगावातील अग्रवाल हॉस्पिटल चौकात घडली.
प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीच्या डिक्कीमध्ये तीन रुपये घेऊन दुचाकीस्वार जात असताना त्यास अज्ञाताने तुमची काहीतरी वस्तू पडली असल्याचे सांगितले. त्या वेळी दुचाकीस्वार वाहन लावून वस्तू पाहण्यास गेला व त्या क्षणी डिक्कीतून अज्ञाताने तीन लाख रुपये घेऊन पोबारा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, शहरातील स्टेट बँक चौकनजीकच एका शिक्षण संस्थाचालकाची अशाच प्रकारे बॅग लाबंविण्यात आली होती. या घटनेचा तपास लागलेला नसताना पुन्हा ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.

 

Web Title: Three lakhs worth of two-wheelers from Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.