भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने जळगावचे तिघं ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:07 PM2018-04-22T23:07:42+5:302018-04-22T23:07:42+5:30

भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात डॉ.अर्जुन तेजमल कोळी (वय ६०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) व  त्यांच्या पत्नी प्रांता (वय ५४) तसेच अलका वसंत नाले (वय ५५, रा.गांधी नगर, जळगाव) हे तिन्ही जण ठार झाले. तर वसंत दामोदर नाले हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता नांदूरा शहराजवळील कोलासर गावाजवळ झाला. 

Three killed in Jalgaon due to collapse of a car by the car | भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने जळगावचे तिघं ठार

भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने जळगावचे तिघं ठार

Next
ठळक मुद्दे नांदुराजवळील कोलासर गावाजवळ अपघात   मित्राच्या अंत्येयात्रेला गेले होते एक जण जखमी

आॅनलाइन लोकमत
जळगाव दि,२२ : भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात डॉ.अर्जुन तेजमल कोळी (वय ६०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) व  त्यांच्या पत्नी प्रांता (वय ५४) तसेच अलका वसंत नाले (वय ५५, रा.गांधी नगर, जळगाव) हे तिन्ही जण ठार झाले. तर वसंत दामोदर नाले हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता नांदूरा शहराजवळील कोलासर गावाजवळ झाला. 
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, डॉ.अर्जुन कोळी व वसंत नाले या दोघांच्या जिवलग मित्राचे अमरावती येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी डॉ.कोळी, त्यांच्या पत्नी प्रांता, वसंत नाले व त्यांच्या पत्नी अलका असे चौघे जण शनिवारी सकाळी कारने (क्र.एम.एच.१९ बी.जे.५६१४) अमरावती येथे गेले होते. रविवारी दुपारी बारा वाजता ते अमरावती येथून परत येत असताना नांदुरा शहरानजीकच्या अन्सारी गावाजवळील पुलावरुन कार खाली कोसळली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने प्रांता कोळी व अलका नाले या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. डॉ.अर्जुन कोळी व वसंत नाले हे देखील जखमी झाले. डॉ.कोळी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना जळगाव येथे आणत असताना रस्त्यातच नशिराबाद गावाजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. नाले यांच्यावर नांदुरा येथे उपचार सुरु आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री दोन्ही महिलांचे मृतदेह जळगावात आणले जाणार आहेत. डॉ.कोळी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

Web Title: Three killed in Jalgaon due to collapse of a car by the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.