‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:20 PM2019-01-17T22:20:01+5:302019-01-17T22:20:23+5:30

तिळामध्ये स्रेहभाव

Those who achieve goals achieve success | ‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

googlenewsNext

पाचोरा, जि. जळगाव : ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला’ नुसतं बोलण्या इतपत न राहता, खरोखर आचरणात आणणे अपेक्षित आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ली, असे म्हणतात. एवढा स्रेहभाव तिळामध्ये असून तिळाप्रमाणे प्रेम वृद्धींगत व्हावे. गुळाचा गोडवा लागावा असे प्रेम, स्रेहभाग, आपुलकी व जिव्हाळा सर्वांमध्ये निर्माण व्हावा हीच यामागची पवित्र संकल्पना आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी एकनिष्ठता असावी लागते. ध्येय व एकनिष्ठता असणारे मातीशी इमान बाळगणाºयांनाच यश प्राप्त होते, असे पाचोरा येथील माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला-गोड बोला’ यावर बोलताना सांगितले.
भारतीय संस्कृतीत एकमेकांना आदराचे स्थान देऊन प्रेम निर्माण केले जाते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत हल्ली दुरावाच निर्माण होत आहे. यातून राग द्वेष, भावना वाढीला लागत आहे. ‘गुड बोल... गोड बोला’ हा संदेश ‘लोकमत’ने सर्वांपर्यंत पोहचवला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेला भरभरून यश दे, त्यांच्या जीवनात गोडी निर्माण व्हावी, सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा. तिळगुळाप्रमाणे एकजीव रहावे हीच मनोकामना.
‘संक्रांत’ हा शब्द ‘संकटरुपी’ असून, सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. दक्षिणायन करून उत्तरायणाकडे वाटचाल करतो. त्याप्रमाणे या संक्रमण काळापासून आपल्या हातून बºया-वाईट सवयी कुणाचे मन दुखावून द्वेष भावना झाली असल्यास त्यांना तीळगूळ देवून आपण त्यात तिळाप्रमाणेच गोडवा निर्माण करूया.

Web Title: Those who achieve goals achieve success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.