थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:08 PM2019-04-18T12:08:21+5:302019-04-18T12:08:47+5:30

साहित्यिक अशोक कौतिक कोळी यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक

Third Income: Political parties are far away from basic issues | थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

Next

रवींद्र मोराणकर
जळगाव : आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित- नावाजलेल्या कलावंत, साहित्यिक, आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात. त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्र्चिले जायला हवे. याचा आढावा घेणारी मुलाखत.
एक कलावंत म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?
सध्याची लोकसभा निवडणूक ही मला घाई-गडबडीची, राजकीय पक्षांच्या लुटूपुटूची लढाई वाटते. त्यात ठरवून मतदारांची दिशाभूल सुरू आहे का काय, असे वाटते. असंबद्ध मुद्दे व वैयक्तिक टीकाटिपणी करून मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताना दिसताहेत. त्यामुळे मतदारांची करमणूक होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?
याऐवजी निवडणुकीत देशहिताचे व समाजहिताचे मुद्दे असायला हवेत. ज्यातून जनतेचे हित, देशाचा विकास, देशातील समाजाचे उन्नत प्रतिबिंब उमटायला हवे व निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार व्हायला हवे. समाजाच्या व देशाच्या आजच्या आशा-आकांक्षा काय आहेत, हे खरं तर निवडणुकीतील मुद्यांमधून डोकायला हवे. ध्येयवाद मला या निवडणुकीत दिसून येत नाही.
तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?
हल्ली साहित्य, कला क्षेत्राला सर्वच पक्ष बेदखल करताना दिसताहेत. विचारवंत, साहित्यिक यांना अडगळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे. वास्तविक निकोप समाजस्वास्थ्यासाठी साहित्य, कला क्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विकास म्हणजे केवळ दगड विटांची बांधकामे नव्हे. निकोप मनाचा नागरिक उन्नत देश घडवू शकेल. निकोप मनाच्या घडणीसाठी निकोप साहित्य, सांस्कृतिक वातावरण हवे. अभिव्यक्तीचा संकोच होता कामा नये.
नवीन मतदारांना काय आवाहन कराल?
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. त्याद्वारे आपला आशाआकांक्षांना सत्यात उतरवण्याची व आपल्या स्वप्नातील देश घडवणाऱ्या धुरीणांना निवडण्याची संधी असते. त्याचा वापर जरूर करावा.

Web Title: Third Income: Political parties are far away from basic issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव