The thieves long lined the Gods in the debris | चोरट्यांनी लांबविले चक्क देव्हाऱ्यातील देव लंपास
चोरट्यांनी लांबविले चक्क देव्हाऱ्यातील देव लंपास

ठळक मुद्देचोरट्यांनी १५ रोजी मध्यरात्री केली घरफोडी१० ग्रॅम सोन्याची चेनसह चांदीचे देव लांबविले.चाळीसगाव पोलिसांनी केला पंचनामा

आॅनलाईन लोकमत
वाघडू, ता.चाळीसगाव,दि.१६ : येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कडीकोंडा तोडून कपाट व लोखंडी पेटीमधील २१ ग्रॅम सोन्याचे दागिने व देव्हाºयातील चांदीचे देवही चोरट्यांनी लंपास केले.
वाघडू येथील जुन्या गावाच्या शेवटी महादेव रतन पाटील यांचे घर आहे. १५ रोजी महादेव पाटील हे परिवारासह गच्चीवर झोपले होते. चोरट्यांनी ही संधी साधत घराच्या देव्हाºयातील चांदीचे सहा देव व कपाटाच्या आतील १० ग्रॅम सोन्याची चैन, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, साडेतीन ग्रॅमची गळ्यातील पोत, लोखंडी पेटीतील बाळाच्या अर्धा ग्रॅम तीन सोन्याच्या अंगठ्या गायब केल्या आहेत. घराच्या मागील बाजूने चोरट्यांनी पलायन केले. या प्रकरणानंतर चाळीसगाव पोलिसांनी पंचनामा केला आहे.


Web Title: The thieves long lined the Gods in the debris
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.