‘त्यांच्यासाठी’ झाडेच म्हणतात... हॅपी बर्थडे टू यु !'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:47 AM2019-06-04T01:47:00+5:302019-06-04T01:49:53+5:30

दरवर्षी १ जूनला केशव रामभाऊ कोतकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या म. फुले कॉलनीतील घरातून ओंसाडून वाहत असतो. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्यांनी आपला ७८ वा वाढदिवस ७८ झाडे लावून साजरा केला. पुढच्या वर्षीही हा वृक्ष लागवडीचा शिरस्ता ते पाळताय. जणू प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला ही झाडे 'हॅपी बर्थडे टु यू !' असा गजर करतात.

'For them' the trees are said to be ... Happy birthday to you! ' | ‘त्यांच्यासाठी’ झाडेच म्हणतात... हॅपी बर्थडे टू यु !'

‘त्यांच्यासाठी’ झाडेच म्हणतात... हॅपी बर्थडे टू यु !'

Next
ठळक मुद्देपर्यावरण दिन विशेषकेशव कोतकरांचा पर्यावरण जागरस्वखर्चाने जगवले २४० वृक्षयावर्षी लावणार ८१ झाडे

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : दरवर्षी १ जूनला केशव रामभाऊ कोतकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या म. फुले कॉलनीतील घरातून ओंसाडून वाहत असतो. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्यांनी आपला ७८ वा वाढदिवस ७८ झाडे लावून साजरा केला. पुढच्या वर्षीही हा वृक्ष लागवडीचा शिरस्ता ते पाळताय. जणू प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला ही झाडे 'हॅपी बर्थडे टु यू !' असा गजर करतात. वाढदिवसाच्या फेसबुकी, बॅनर आणि डीजे संस्कृतीला फाटा देत वयाच्या ८१ व्या वर्षी ते पर्यावरणाचा आगळावेगळा जागर करीत आहे. चाळीसगाव शहर परिसरात कोतकर परिवाराने केलेली वृक्ष लागवड 'हिरव्यागार' अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
आई आणि झाड यांचे प्रेम निस्वार्थ असते. त्यांची ओंजळ इतरांना देण्यासाठी भरलेली असते. अशा भरलेल्या काही ओंजळी आपणही तयार कराव्यात. अशा समर्पित भावनेने केशव कोतकर यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. आजवर २४० झाडांनी म. फुले कॉलनीचा परिसर नटला असून ‘मे हीट’च्या तडाख्यात परिसराच्या डोक्यावर या झाडांनी आता सावली धरली आहे.
पेढा अन् झाडाचाही गोडवा
चाळीसगावचा 'नंदन' पेढा सातासमुद्रापार पोहचलाय. केशव कोतकर यांना चाळीसगाव मिल्कसिटीत 'मिल्कमॅन' म्हणूनही ओळखतात. हाती शून्य असताना त्यांनी आपल्या डेअरी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. २०१६ मध्ये त्यांनी सर्वप्रथम वयाच्या इतकी झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यावर्षी ७८ झाडे लावून त्यांनी र्खया अर्थाने 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हा संदेशही रुजवला. पेढ्यांसोबतच झाडांचाही गोडवा वाटायला सुरुवात केली. २०१७ मध्ये ७९ आणि २०१८ मध्ये ८० अशी २४० झाडे त्यांनी स्वखर्चाने जगवली आहे.
झाडांना पाणी, देखरेखही
म. फुले कॉलनीत सद्य:स्थितीत बहरलेली झाडे दिसतात. कोतकर परिवरातील केशव कोतकर यांच्या पत्नी वत्सला, त्यांचा मुलगा राजेंद्र व स्नुषा व्यवसायाचा व्याप सांभाळून वृक्ष सेवा करतात. लावलेल्या झाडांना लोखंडी जाळीचे कुंपण, देखरेख, त्यांना दिवसातून दोन वेळा पाणी देणे. अशी कामे हा परिवार मोठ्या आनंदाने करतो. झाडांना पाणी देण्यासाठी गाडी तयार केली आहे.
वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी त्यांनी घराच्या प्रवेशव्दारानजीक 'झाडे लावा, झाडे जगवा...' असा संदेश देणारे लक्षवेधक स्मृतीचिन्हही साकारले आहे.
यावर्षी ८१ झाडे लावणार
केशव कोतकर यांचा वाढदिवस ८१ झाडे लावून साजरा होतोय. यावर्षी झाडे लावण्यासाठी शहिद हेमंत जोशी क्रीडांगणच्या संरक्षक भिंतीचा परिसर निश्चित करण्यात आला आहे. तापमानाचा दाह असल्याने लावलेली झाडे जगणार नाहीत, म्हणून १ जून रोजी एकच झाड लावले. पाऊस पडल्याबरोबर उर्वरीत ८० झाडे लावून त्यांना संरक्षण म्हणून लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहे, अशी माहिती राजेंद्र कोतकर यांनी दिली.
झाडे लावून साजरा करा वाढदिवस
हल्ली वाढदिवस साजरा करण्याची 'जोरदार' चढाओढ असते. त्याला उत्सवी स्वरुप देऊन मोठा खर्च केला जातो. हे सर्व टाळून वाढदिवसाला सामाजिक सेवेचा दीप पेटविला पाहिजे. याच भावनेतून वृक्षांसोबत मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतोय. यातून मोठे समाधान मिळते.
- केशव रामभाऊ कोतकर
दूध डेअरी व्यवसायिक, चाळीसगाव.
 

Web Title: 'For them' the trees are said to be ... Happy birthday to you! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.