श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या लखलखाटात भिडेवाड्यातील विद्येचे मंदिर शासनाच्या अनास्थेमुळे झाकोळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:36 AM2019-01-06T01:36:02+5:302019-01-06T01:37:13+5:30

पुणे येथे भिडे वाड्यातील क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले या विद्येची साक्षात देवता असलेल्या सरस्वतीच्या मंदिराच्या एकीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाखो करोडो रूपयांची व रत्न जडजवाहीरांची देणगी देऊन दर्शनासाठी उच्च विद्याविभूषित युवती वा महिलांची श्रध्देमुळे वाढणारी गर्दी तर दुसरीकडे रेड लाईट एरियात या एकविसाव्या शतकातही पीडित महिलांवर अत्याचाराचे सर्रास कुकर्म होत असल्याची वास्तवता शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. एकीकडे श्रध्देपोटी लखलखणाऱ्या गणपती मंदिराच्या आड तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या वस्तीआड साक्षात विद्येची देवता असलेल्या सावित्रीआईचे मंदिर व इतिहास राजकीय व्यवस्था व शासनाच्या अनास्था तथा उदासीन धोरणामुळे झाकोळल्याची खंत व्याख्यात्या कविता पवार यांनी येथे व्यक्त केली.

Temple of Bhidewada under the lofty temple of Lord Ganesh temple, reveals due to anarchy | श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या लखलखाटात भिडेवाड्यातील विद्येचे मंदिर शासनाच्या अनास्थेमुळे झाकोळतेय

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या लखलखाटात भिडेवाड्यातील विद्येचे मंदिर शासनाच्या अनास्थेमुळे झाकोळतेय

googlenewsNext
ठळक मुद्देरावेर येथे ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार वितरणात व्याख्यात्या कविता पवार यांची खंतविविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

रावेर, जि.जळगाव : पुणे येथे भिडे वाड्यातील क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले या विद्येची साक्षात देवता असलेल्या सरस्वतीच्या मंदिराच्या एकीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाखो करोडो रूपयांची व रत्न जडजवाहीरांची देणगी देऊन दर्शनासाठी उच्च विद्याविभूषित युवती वा महिलांची श्रध्देमुळे वाढणारी गर्दी तर दुसरीकडे रेड लाईट एरियात या एकविसाव्या शतकातही पीडित महिलांवर अत्याचाराचे सर्रास कुकर्म होत असल्याची वास्तवता शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. एकीकडे श्रध्देपोटी लखलखणाऱ्या गणपती मंदिराच्या आड तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या वस्तीआड साक्षात विद्येची देवता असलेल्या सावित्रीआईचे मंदिर व इतिहास राजकीय व्यवस्था व शासनाच्या अनास्था तथा उदासीन धोरणामुळे झाकोळल्याची खंत व्याख्यात्या कविता पवार यांनी येथे व्यक्त केली.
खान्देश माळी महासंघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाºया महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्काराने सन्मान करण्यासाठी आयोजित गौरव समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खान्देश माळी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शकुंतला महाजन होत्या.
प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कविता पवार, शकुंतला महाजन, उपनगराध्यक्ष संगीता वाणी, शारदा चौधरी, संगीता महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, सावद्याच्या नगरसेविका विजया जावळे व पत्रकार प्रवीण पाटील, भारती अग्रवाल, विजयामाला अग्रवाल यांच्याहस्ते पुष्पार्पण व दीपप्रज्वालन करण्यात आले.
खान्देश माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पिंटू महाजन यांनी प्रास्ताविक केले.
रम्यान, शिशुवर्गातील अवघ्या सहा वर्षांची चिमुरडी रागिणी ज्ञानेश्वर महाजन हिने आपल्या बोबड्या बोलीत सावित्रीबाई फुलेंचे जीवनचरित्रावर मौखिक मनोगत व्यक्त करून उपस्थितांच्या मनाला साद घातली.
दरम्यान, खान्देश माळी महासंघातर्फे सुनीता दीपक वाणी (मुख्याध्यापिका, कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूल, रावेर), सविता माळी, वरणगाव (मरणोत्तर देहदान), सरपंच कल्पना जाधव (रसलपूर), माध्यमिक शिक्षिका अर्चना मधुकर पाटील (केºहाळे बुद्रूक) व नगरसेविका मीनाक्षी राजेश कोल्हे (सावदा) यांना त्यांच्या अलौकिक कायार्मुळे ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराचे स्मृतीचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
सावित्रीच्या लेकी या विषयावर आयोजित व्याख्यानात पुढे बोलताना कविता पवार म्हणाल्या, क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले मनुवादाच्या अंधारलेल्या काळोखातील पुरूषप्रधान संस्कृतीतल्या जगातल्या पहिल्या महानायिका होत. त्यांचा इतिहास ऐकण्याऐवजी आपण त्यांची काव्यफुले, बावनकशी, रत्नावली, शेतकºयांचा आसूड अशी ग्रंथसंपदा वाचून स्वत: आत्मनिर्भर व उद्यमशीलतेतून स्वावलंबी बनून क्रांतीज्योतीची ठिणगी आपल्या आयुष्यात पाडत एकविसाव्या शतकातील सावित्री बनून इतिहास घडवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामायणातील शोषिक सीता, डोळ्यावर काळी पट्टी चढवलेली गांधारी, कुंती वा वस्त्रहरण झालेली द्रौपदी मुळीच न बनता, दैनंदिन जीवनात वाटचाल करताना पुरूषी वासना, वाईट नजरा, घाणेरडे स्पर्श सहन न करता त्यांना जागच्या जागीच आक्रमकपणे लढा देत संघर्ष करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
शिक्षणाचा अर्थ म्हणजे मुक्त होणे वा स्वैराचार करणे असा होत नाही. शिक्षणासोबत नैतिकतेची व संस्कारांची जोड द्या अन्यथा ते व्यर्थ आहे. तुम्ही आधुनिक बना पण पाश्चातिकरण करू नका. कारण भारतीय संस्कृती महान आहे. विचार आधुनिक करा पण कपड्यांचे पाश्चातिकरण करू नका, असा सल्लाही त्यांनी युवतींना दिला. बेटी बचाओ बेटी पढाओ ही आता काळाची गरज ठरली आहे. महिलांची साक्षरता अजूनही १०० टक्के नसल्याची खंत व्यक्त करून, गुणवंत असलेल्या मुलींना सावित्रीबाईंचा वारसा लाभल्याने गुणवंतांच्या रांगेत केवळ मुलीच दिसत असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी प्रकट केला. कारण मुल कुठे तर फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर असल्याने बक्षीसांच्या रांगेत ते दिसत नसल्याचे मोठे दुर्दैव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उच्चविद्याविभूषित शहरातील मुलींना सावित्रीबाई फुले माहित नसतात .ग्रामीण भागातील मुलींना मात्र त्या संघषार्ची जाण असल्याने त्या जाणतात.म्हणून ग्रामीण भागातील मुलींनी कोणताही न्यूनगंड ठेवू नये. कारण ग्रामीण भागातही धनुर्विद्या संपादन करून आॅलिंपिकमध्ये खेळण्याची मनिषा युवतींमध्ये दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यशाच्या राजमार्गावर चालतांना त्या रस्त्यावरील मैलाचा दगड तुम्ही विसरत असल्याने शिक्षणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता सावित्रीबाईंचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली .
सावित्रीआईंनी मुंढवा गाव ते सासवड ५ कि.मी. अंतर पाठीवर यशवंताला बांधून आणून तेथे त्याच्यासह महामारीतील प्लेगच्या रूग्णांची सुश्रूषा केली. ती सेवा करतांना त्या शहीद झाल्या याची नोंद इतिहासाने कुठेही न घेतल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्त केली.म्हणून आपण २१ व्या शतकातील मुली सावित्री आईचा वारसा घेऊन चालत असल्याने या इतिहासाचा प्रचार व प्रसार सोशियल मिडीयातून करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही आसाराम बापू, रामरहीम व राधेमॉ च्या बुवाबाजीला मानत नाहीत. कालसर्प, पितृदोष, कुंडली बघत नाहीत. मुलींनो उद्योजिका बना. कृतीशिल बनण्याची गरज असून घरात बसल्या बसल्या उद्योजक बनू शकता. अर्थार्जन करून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून निर्णयक्षमतेत सहभागी होवू शकत असल्याने उद्याच्या मुलींना व सुनांना आपण आदर्श ठरू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार दिलीप वैद्य यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन पल्लवी महाजन व चैताली महाजन यांनी केले. जितेंद्र पवार, सचिन जाधव, माधव महाजन , ई जे महाजन,अनिल महाजन, डी.डी.वाणी, टी.बी.महाजन, डी.डी. वाणी,आदी उपस्थित होते. कांतीलाल महाजन, रामकृष्ण महाजन, शामराव चौधरी, फकिरा महाजन, प्रकाश महाजन यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार आकाश महाजन यांनी मानले.

 

Web Title: Temple of Bhidewada under the lofty temple of Lord Ganesh temple, reveals due to anarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.