समाजावर प्रेम, परोपकार हिच संतांची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 08:26 PM2018-12-14T20:26:21+5:302018-12-14T20:27:48+5:30

स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला परिचय आहे, अशी शिकवण देणारे जगन्नाथ महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी समाधी स्थळी उपस्थित असंख्य भाविक भक्तांना आशीर्वचन देताना सांगितले.

The teachings of saints, charity, love and philanthropy on society | समाजावर प्रेम, परोपकार हिच संतांची शिकवण

समाजावर प्रेम, परोपकार हिच संतांची शिकवण

googlenewsNext
ठळक मुद्देफैजपूर येथे दोन दिवसीय कार्यक्रमात संतांचे आशीर्वचनमहामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज समाधी स्थळी असंख्य भाविकांची हजेरीसतपंथ संस्थानचा अधिकृत पेन आणि ११ कोटी मंत्र जप लिहिलेल्या वह्यांचे पूजन संतांच्या हस्ते पूजन

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला परिचय आहे, अशी शिकवण देणारे जगन्नाथ महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी समाधी स्थळी उपस्थित असंख्य भाविक भक्तांना आशीर्वचन देताना सांगितले.
ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज यांचा सतरावा पुण्यतिथी महोत्सव १३ व १४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील असंख्य भाविक उपस्थित होते.
व्यासपीठावर परमपूज्य छगनबाप्पा, परमपूज्य संत गोपालचैतन्य महाराज, महामंडलेश्वर पुरुषात्तम महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, शामचैतन्यदासजी महाराज, अंकुश महाराज, नितीन महाराज, ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यासह अनेक संत उपस्थित होते.
वृंदावनधाम पाल येथील गोपालचैतन्यजी महाराज यांनी आशीर्वचन दिले की, मनुष्य जीवनाचे रहस्य गुरूंच्या सानिध्यात राहून समजते. परम गुरू शरीररुपी नसून एक तत्त्व आहे. त्यांच्या कृपेने मनुष्य संसारिक तापातून मुक्त होतो. म्हणून प्रत्येकाने गुरूंचा उपदेश सर्वोत्कृष्ट मानावा, असे सांगितले. सतपंथाचे कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सातासमुद्रापार तर पोहचवलेच; पण फैजपूर नगरीत सर्वधर्माच्या संतांंना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे जगाच्या पाठीव फैजपूर नगरीचा नावलौलिक झाला आहे.
कीर्तनकार योगेश्वर उपासनी महाराज यांनी पुण्यतिथी अशाच संतांची साजरी केली जाते की जे ब्रह्मलिन होऊन आपले कार्य समाजासाठी भविष्यात प्रेरणा दायक ठरते, म्हणून आपण या ठिकाणी आज असंख्य संख्येने उपस्थित आहात. यासह महामंडलेश्वर पुरुषत्तम दासजी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, परमपूज्य छगणबाप्पा महाराज यांनी आशीर्वचन दिले.
दरम्यान, सतपंथ संस्थानचा अधिकृत पेन आणि ११ कोटी मंत्र जप लिहिलेल्या वह्यांचे पूजन संतांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, संजय गांधी अध्यक्ष विलास चौधरी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यासह असंख्य भाविक उपास्थित होते. सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन व निर्मल चतुर यांनी केले आहे.
गुरुवारी सायंकाळी पुण्यतिथी महापूजा तसेच शुक्रवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नागरिकांनी शोभायात्रे दरम्यान रांगोळी काढूून सजवण्यात आले होते. यात फैजपूर, चिनावल, राजोरा, मलकापूर, खडका, विवरा, वढोदा येथील भजनी मंडळ सहभागी होते.
 

Web Title: The teachings of saints, charity, love and philanthropy on society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.