अमळनेर येथे बीएलओची कामे करण्यास शिक्षकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 05:34 PM2017-11-16T17:34:20+5:302017-11-16T17:39:56+5:30

विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने ही कामे अन्य कर्मचाºयांना देण्याची मागणी

Teachers refuse to work for BLO at Amalner | अमळनेर येथे बीएलओची कामे करण्यास शिक्षकांचा नकार

अमळनेर येथे बीएलओची कामे करण्यास शिक्षकांचा नकार

Next
ठळक मुद्देबीएलओची कामे करण्यास शिक्षकांचा नकारअमळनेर तहसीलदारांना दिले निवेदनअंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांना कामे देण्याची केली मागणी

आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.१६ - शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये असा कायदा असताना ही त्यांना बी.एल.ओ. ची कामे दिल्याने ते कामे करण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. गुरुवारी या आशयाचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये असा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. बी.एल.ओ.ची कामे अंगणवाडी सेविका, तलाठी, लेखापाल, पोस्टमन, आरोग्यसेविका यांनाही देण्याची तरतूद आहे. मात्र फक्त शिक्षकांनाच ही कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे बी.एल.ओ. ची कामे शिक्षकांकडून काढण्यात यावे. ही कामे न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आशयाचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील व प्रांताधिकारीचे प्रतिनिधी नायब तहसीलदार डी.एम.वानखेडे यांना देण्यात आले. यावेळी रावसाहेब मांगो पाटील, दत्तात्रय सोनवणे, विजय चव्हाण, रतिलाल महाले, संजय देवरे, अरुण पवार, भगवान पाटील, वंदना पाटील, चंद्रकांत कणखरे, मकरंद निळे, दिनेश पालवे, शशिकांत पवार, आनंद अहिरे, भूषण पाटील, योगेश पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Teachers refuse to work for BLO at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.