लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ (जळगाव) : निंभोरा-दीपनगर, पिंप्रीसेकम ग्रुप ग्रामपंचायतीचे चार दिवसांपासून बेपत्ता असलेले सरपंच शालिक सोनू सोनवणे (६१) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर चार तास रास्ता रोको केले.
पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या सर्व १६ सदस्यांना ताब्यात घेतले आहे. सरपंच शालिक सोनवणे हे १५ जूनपासून बेपत्ता झाले होते. सोनवणे यांच्या शरीरावर हल्ल्याच्या कुठल्याही जखमा आढळलेल्या नाहीत़ मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी मृतदेहाचे धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येत आहे़ अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा ठरेल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.