अन् चाळीसगावात खासदार सुप्रिया सुळे यांनी हातगाडीवरुन घेतले खारे शेंगदाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:20 PM2018-02-23T12:20:03+5:302018-02-23T12:25:33+5:30

Supriya Sule sweet peanuts taken | अन् चाळीसगावात खासदार सुप्रिया सुळे यांनी हातगाडीवरुन घेतले खारे शेंगदाणे

अन् चाळीसगावात खासदार सुप्रिया सुळे यांनी हातगाडीवरुन घेतले खारे शेंगदाणे

Next
ठळक मुद्देसत्यनारायणाचाही घेतला प्रसादयुवकांशी साधला संवाद

जिजाबराव वाघ/आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि.२२ - चाळीसगाव - भडगाव रस्त्यावर हिंगोणे गावाजवळ तीन हजाराहून अधिक मोटारसायकलस्वार तरुणांचा ताफा...गाड्यांना राष्ट्रवादीचा ध्वज आणि गगनभेदी घोषणांनी दणाणलेला परिसर...पाचोरे येथून निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री सुनील तटकरे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, चित्रा वाघ आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाडी ताफ्याला करकचून ब्रेक लागतात. युवकांचा ताफा पाहून नेतेमंडळी भारावून जाते. गाडीच्या खाली उतरुन सुप्रिया सुळे युवकांशी संवाद साधतात. गुरुवारी चाळीसगाव येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेपूर्वी सायंकाळी सहा वाजता त्यांचे असे स्वागत झाले.
हिंगोणे ते चाळीसगाव अशी १५ किमी अंतराची मोटारसायकल रॅली माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. रॅलीत रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हिंगोणे, बोरखेडे, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा., खरजई नाका येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधला. विशेषत: सुप्रिया सुळे यांनी महिला व युवतींशी हस्तांदोलन तर कधी हात उंचावून हितगुज केले. हे १५ किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना दोन तास लागले. ठिकठिकाणी त्यांना निवेदनेही देण्यात आली.
हातगाडीवरुन घेतले शेंगदाणे
मोटारसायकल रॅलीसह सुप्रिया सुळे यांनी खरजई नाका परिसरात आल्या. येथेही त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. याचंवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असणा-या खारे शेंगदाणे - फुटाणे विक्रेत्याच्या हातगाडीवर त्या गेल्या. विक्रेत्याला 'भाऊ कसे आहात...' म्हणत त्यांनी खारे शेंगदाणेही विकत घेतले. चार- दोन शेंगदाणे तोंडात टाकून गावरान मेव्याचा अस्वादही घेतला. सुप्रिया सुळे यांच्या अपुलकीच्या चौकशीमुळे विक्रेता हरखून गेला. पैसे नकोत म्हणून तो हसला. मात्र सुप्रिया सुळे यांनी त्याच्या हातावर पैसे ठेवत पुढची वाट धरली. बलाराम व्यायाम शाळेच्या पटांगणावर रात्री साडे आठ वाजता हल्लाबोल आंदोलनाच्या जिल्ह्यातील सांगता सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेऊन राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. सभेला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने नेत्यांनी राजीव देशमुख यांचे भरभरुन कौतुक केले. मोटारसायकल रॅलीत प्रमोद पाटील, शशिकांत साळुंखे, दिनेश पाटील, मंगेश राजपुत, शाम देशमुख, भगवान राजपूत, भुषण पाटील, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, अमोल चौधरी आदी सहभागी झाले होते.
सत्यनारायणाचा प्रसादही घेतला
सभा संपल्यानंतर औरंगाबादरोड लगत कोळी महास:घाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक आनंदा कोळी यांनी सुप्रिया सुळे यांना सत्यनारायणचा प्रसाद घेण्याची विनंती केली. त्यावर सुळे यांनी तात्काळ होकार देत कोळी यांच्याकडील सत्यनारायणाची पुजा करुन प्रसादही घेतला. यावेळी कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने जमले होते.

Web Title: Supriya Sule sweet peanuts taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.