विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 03:00 PM2019-07-08T15:00:08+5:302019-07-08T15:01:18+5:30

महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अतोनात परिश्रम घेऊन समाज परिवर्तनाचे काम केले म्हणून आपण निर्भयपणे आपले विचार व्यक्त करू शकतो. या महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करा. आई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान करा. नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मांडले.

Students should develop ideas of great men | विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करावी

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करावी

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचे प्रतिपादनआई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान कराविद्यार्थिनींना दिली पिस्तूलची प्रात्यक्षिकासह माहिती

धरणगाव, जि.जळगाव : महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अतोनात परिश्रम घेऊन समाज परिवर्तनाचे काम केले म्हणून आपण निर्भयपणे आपले विचार व्यक्त करू शकतो. या महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करा. आई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान करा. नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मांडले.
येथील पी. आर. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी होते.
प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी केले. अंबादास मोरे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. पोलीस हे मित्र असतात हे स्पष्ट करून त्यांनी मुलींना निर्भय होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात सुनील चौधरी आणि मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर डी.एस.पाटील यांनी केल,े तर आभार शरदकुमार बन्सी यांनी मानले.
यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोरे यांनी विद्यार्थिनींना पिस्तूलची प्रात्याक्षिकासह माहिती दिली.

Web Title: Students should develop ideas of great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.