जळगावात ब्रोकरला मारहाण करुन तीन लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:54 PM2019-03-25T21:54:44+5:302019-03-25T21:57:10+5:30

नाशिकवाल्यांचे पैसे दे म्हणत चेतन लखीचंद छाजेड (३४, रा. चर्चच्या पाठीमागे,महाबळ परिसर) या ब्रोकरला तिघांनी त्यांच्यात कार्यालयात बेदम मारहाण केली. कॅबीनच्या काचेवर डोके आदळल्याने छाजेड रक्तबंबाळ झाले. दरम्यान, मारहाणीनंतर तिघांनी तीन लाख रुपये रोख व हातातील सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याचा आरोप आहे. सोमवारी रात्री आठ वाजता शिवतीर्थ मैदानाच्या परिसरात ही घटना घडली.

Strike the broker in Jalgaon and up to three lakhs | जळगावात ब्रोकरला मारहाण करुन तीन लाख लांबविले

जळगावात ब्रोकरला मारहाण करुन तीन लाख लांबविले

Next
ठळक मुद्दे शिवतीर्थ मैदानाजवळील घटना  ठार मारण्याची सुपारी घेतल्याची दिली धमकीकार्यालयाची तोडफोड

जळगाव : नाशिकवाल्यांचे पैसे दे म्हणत चेतन लखीचंद छाजेड (३४, रा. चर्चच्या पाठीमागे,महाबळ परिसर) या ब्रोकरला तिघांनी त्यांच्यात कार्यालयात बेदम मारहाण केली. कॅबीनच्या काचेवर डोके आदळल्याने छाजेड रक्तबंबाळ झाले. दरम्यान, मारहाणीनंतर तिघांनी तीन लाख रुपये रोख व हातातील सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याचा आरोप आहे. सोमवारी रात्री आठ वाजता शिवतीर्थ मैदानाच्या परिसरात ही घटना घडली. 
          याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चेतन छाजेड यांचे शिवतीर्थ मैदानाजवळ अंतरिक्ष भवनच्या शेजारी कार्यालय आहे. ते कार्यालयात असताना अचानक तीन ते चार जण तेथे आले. नाशिकच्या माणसाचे पैसे दे असे सांगत वाद घालायला सुरुवात केली. कोणते पैसे व कोण नाशिकचा माणूस असे छाजेड यांनी विचारले असता तिघांनी मारहाण करायला सुरुवात केली. दोघांनी त्यांना धरुन डोके कॅबीनच्या काचेवर आदळले, त्यामुळे डोक्यात काच घुसून ते रक्तबंबाळ झाले. कार्यालयातील अकाऊंट कुळकर्णी व सहकाºयांनी बचावासाठी धाव घेतली असता मारहाण करणारे पळून गेले. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयातील तीन लाख रुपये रोख व छाजेड यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्याही काढून घेतल्याची माहिती लोमेश सपकाळे यांनी दिली.

Web Title: Strike the broker in Jalgaon and up to three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.