पारोळा तालुक्यातील टेहू येथे आजपासून राज्यस्तरीत विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:12 PM2018-12-11T16:12:05+5:302018-12-11T16:13:25+5:30

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि वसंतराव मोरे तंत्रनिकेतन, टेहू, ता.पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने टेहू, ता.पारोळा येथे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सातवे इन्स्पायर अवार्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे.

State-wide science exhibition from Tehu in Parola taluka today | पारोळा तालुक्यातील टेहू येथे आजपासून राज्यस्तरीत विज्ञान प्रदर्शन

पारोळा तालुक्यातील टेहू येथे आजपासून राज्यस्तरीत विज्ञान प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यातून सात उपकरणांचा असेल सहभागसंपूर्ण राज्यातून येतील २५० उपकरणेराष्टÑीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवडली जातील सात उपकरणे

पारोळा, जि.जळगाव : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि वसंतराव मोरे तंत्रनिकेतन, टेहू, ता.पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने टेहू, ता.पारोळा येथे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सातवे इन्स्पायर अवार्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे.
यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सात अशी राज्याभरातून २५० उपकरणे मांडण्यात येतील. यातून सात उपकरणे ही राष्टÑीय स्तरावरील प्रदर्शनासाठी निवडली जातील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अँड वसंतराव मोरे यांनी दिली.
१२ रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण संचालक रामचंद्र जाधव यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अ‍ॅड.वसंतराव मोरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डायटचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन असतील.
१४ रोजी पारितोषिक व समारोप समारंभ होईल. बक्षीस वितरण राज्याचे उपसचिव डॉ.आनंदसिंग पवार यांच्या हस्ते होईल.
विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना ने-आण करण्यासाठी पारोळा बसस्थानकावरून बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे यांनी दिली.

Web Title: State-wide science exhibition from Tehu in Parola taluka today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.