अमळनेर येथे लसीकरणासाठी बालकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:13 PM2018-12-09T18:13:55+5:302018-12-09T18:15:20+5:30

अमळनेर तालुक्यातील २११ शाळांमधील सुमारे ३० हजार मुलांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

Spontaneous response to children for immunization at Amalner | अमळनेर येथे लसीकरणासाठी बालकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

अमळनेर येथे लसीकरणासाठी बालकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे३० हजार बालकांना झाले लसीकरणअमळनेर तालुक्यात २६४ शाळा असून, ८० टक्के लसीकरण झाले आहे.आश्रमशाळेत मात्र गैरहजेरीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त

अमळनेर, जि.जळगाव : अमळनेर तालुक्यातील २११ शाळांमधील सुमारे ३० हजार मुलांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. आश्रमशाळांमध्ये मात्र विद्यार्थी गैरहजर राहिल्याने तेथील प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी दिसून आले आहे. विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले आहे.
अमळनेर तालुक्यात २६४ शाळा असून, ८० टक्के लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्ये निरुत्साह असला तरी विद्यार्थी मात्र आनंदाने लसीकरण करून घेत आहेत. शहरात मात्र पालक स्वत: मुलांसोबत जाऊन शाळेत लसीकरण करून घेत आहेत, जे मुले गैरहजर आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात पुन्हा शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. शाळेतील मुलांच्या लसीकरणांनातर अंगणवाड्यांंमध्ये सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना देण्यात येईल व जी लहान मुले अंगणवाड्यात नाहीत अशा बालकांनाही अंगणवाड्यांमध्ये बोलावून लसीकरण केले जाणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, समाजसेवक, सर्वांचे चांगले सहकार्य मिळत आहे.
लसीकरणाच्या पथकात ५८ आरोग्यसेविका, १० पर्यवेक्षक, २२ आरोग्य सेवक, १७९ आशा कार्यकर्त्या, २७० अंगणवाडी सेविका, सहा परिचारिका यांची नियुक्ती केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.गिरीश गोसावी (ढेकू), डॉ.चंदन पवार (मांडळ), डॉ.प्रशांत कुलकर्णी (मारवाड), डॉ.सुरेखा हिरोळे, डॉ.नीलिमा देशमुख (पातोंडा), डॉ.संजय रनालकर (जानवे), डॉ.विसावळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे , डॉ.जी.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा.रुग्णालयाचे डॉ.विलास महाजन, डॉ.राजेंद्र शेलकर आदी विविध प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक प्रमुख परिश्रम घेत आहेत

पहिली ते दहावीपर्र्यंत शाळांमधील ८० टक्के लसीकरण झाले आहे. १२ मुलांना किरकोळ परिणामाव्यतिरिक्त कोणालाही गंभीर दुष्परिणाम झालेले नाहीत. खासगी डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-डॉ.दिलीप पोटोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, अमळनेर

शासनाने मोफत गोवर रुबेला लस उपलब्ध करून दिल्याने गरिबांचे पैसे वाचले आणि मुलांच्या भविष्यातील आरोग्याची हमी मिळाली आहे.
- परवेज शेख, अमळनेर

ज्याप्रमाणे शासनाने गोवर रुबेला लसीकरण मोफत उपलब्ध केले त्याचप्रमाणे निमोनिया आणि डायरियाच्या लसीदेखील सुमारे तीन हजार रुपयांला पडतात, त्याही शासनाने मोफत उपलब्ध केल्यास बालमृत्यू थांबविण्यात यश मिळेल.
-अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, नागरिक, अमळनेर

सामूहिक एकाच वेळी लसीकरण होत असल्याने सर्व विद्यार्थी हसत खेळत लस घेत आहेत. मोजके विद्यार्थी घाबरत आहेत. एकमेकांचे पाहून प्रतिसाद चांगला मिळाला.
-पी.बी.पाटील, मुख्याध्यापक, अमळनेर

गोवर रुबेला लस दिल्याने मुलींच्या संभाव्य रुबेलावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे, तर गोवरचे समूळ निर्मूलन करून बालमृत्यू थांबवता येणार आहे. यातून बालकांना संरक्षण मिळेल.
- डॉ.जी.एम.पाटील, बालरोगतज्ज्ञ, अमळनेर

 

Web Title: Spontaneous response to children for immunization at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.