जळगाव शहरात दुचाकीवरुन आलेल्या महिलेने लांबविली शिक्षिकेची सोनसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 08:43 PM2018-03-19T20:43:12+5:302018-03-19T20:43:12+5:30

तरुणासोबत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेने मुलांना शिकविणीसाठी सोडायला जात असलेल्या सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) या शिक्षिकेच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजता भिकमचंद जैन नगरात घडली. दरम्यान, दुचाकीस्वार दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत.

Sonjakhali school teacher from Jalgaon city | जळगाव शहरात दुचाकीवरुन आलेल्या महिलेने लांबविली शिक्षिकेची सोनसाखळी

जळगाव शहरात दुचाकीवरुन आलेल्या महिलेने लांबविली शिक्षिकेची सोनसाखळी

Next
ठळक मुद्दे भिकमचंद जैन नगरातील घटना   दुचाकीवरील दोन्ही चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद महिलेचा प्रथमच वापर

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १९ : तरुणासोबत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेने मुलांना शिकविणीसाठी सोडायला जात असलेल्या सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) या शिक्षिकेच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजता भिकमचंद जैन नगरात घडली. दरम्यान, दुचाकीस्वार दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोनल सोमाणी या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. सोमवारी दुपारी शाळेतून आल्यानंतर मुलाला शिकवणीसाठी जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर थोड्याच अंतरावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ बी.के.८७७०) दाढी वाढलेला २१ ते २२ वयोगटातील तरुण व त्याच्या मागे बसलेली हिरव्या रंगाची पॅँट परिधान केलेली १९ ते २१ वयोगटातील तरुणी असे आले. सोमाणी यांच्याजवळ दुचाकी हळू करुन तरुणीने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी तोडून पलायन केले.
महिलेचा प्रथमच वापर
सोनसाखळी चोरीत जिल्ह्यात प्रथमच महिलेचा वापर झाला आहे. याआधी अमळनेर येथील तरुणी चोरीच्या गुन्ह्यात निष्पन्न झाली होती. सोनसाखळी लांबविण्यात दिल्ली येथे महिला आघाडीवर आहेत. आता जिल्ह्यातही वापर झाला आहे. 

Web Title: Sonjakhali school teacher from Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.