भडगाव नूतन नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अतुल पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:06 PM2019-03-19T22:06:14+5:302019-03-19T22:08:04+5:30

भडगाव येथील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी गणेश मरकड यांनी जाहीर केले.

Shiv Sena's Atul Patil unanimously elected as president of Bhadgaon Nutan city | भडगाव नूतन नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अतुल पाटील बिनविरोध

भडगाव नूतन नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अतुल पाटील बिनविरोध

Next
ठळक मुद्देपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकलानिवडीनंतर जल्लोषात स्वागतशहराच्या विकासासाठी प्राधान्य देऊ.

भडगाव, जि.जळगाव : येथील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंगळवारी झालेल्या सभेत पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार गणेश मरकड यांनी जाहीर केले. निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी नूतन नगराध्यक्षांंचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कामकाज पाहिले.
या वेळी मावळते नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.वसीम बेग मिर्झा, नगरसेवक श्यामकांत भोसले, संजय भिल, सुभाष पाटील, भिकनूर पठाण, करुणाबाई देशमुख, सुशीला पाटील, योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील, कमलबाई अहिरे, रंजना पाटील, वैशाली महाजन, स्वीकृत नगरसेवक नंदकिशोर पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष शशीकांत येवले, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, माजी नगरसेवक सुनील भोई, भाऊसाहेब भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील, जगदीश भोई, प्रदीप देशमुख, सुनील चौधरी, सहकार क्षेत्रप्रमुख युवराज पाटील, नीलेश पाटील, सजय दामू पाटील, अनिल पाटील, डी.डी.पाटील, दिलीप पवार, भागवत देवरे, सुरेश नरवाडे, दिलीप सहस्त्रबुद्धे, विनायक देशमुख, आधार पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते, तर राष्ट्रवादीचे गटनेते प्रशांत पवार, सुवर्णा भैयासाहेब पाटील, राजेंद्र देशमुख, जाकेरा बी.मलीक, भाजपाचे अमोल पाटील, शिवसेनेच्या कल्पना भोई आदी सहा नगरसेवकांची अनुपस्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. पालिका परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शहराच्या विकासासाठी प्राधान्य देऊ. गिरणेवरील बंधारा, पाणीपुरवठा योजना आदी प्रलंंिबत प्रश्न मार्गी लावू. शहरातील सीटी सर्वेत भोगवटा विषयही मार्गे लावू.
- अतुल पाटील, नूतन नगराध्यक्ष, भडगाव

Web Title: Shiv Sena's Atul Patil unanimously elected as president of Bhadgaon Nutan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.