१२० कोटींच्या केटामाईन तस्करी प्रकरणात सात जण दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:53 PM2019-04-18T12:53:35+5:302019-04-18T12:54:10+5:30

पाच जण निर्दोेष, २२ रोजी अंतिम निकाल

Seven persons convicted in the 120-crore Ketamine smuggling case | १२० कोटींच्या केटामाईन तस्करी प्रकरणात सात जण दोषी

१२० कोटींच्या केटामाईन तस्करी प्रकरणात सात जण दोषी

Next

जळगाव : तब्बल १२० कोटी रुपये किंमतीच्या केटामाईन (अंमली पदार्थ) तस्करी प्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले तर ५ जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. या सात आरोपींना २२ रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. बुधवारी न्या.एस.जी.ठुबे यांनी या आरोपींना दोषी धरले.
१३ डिसेंबर २०१३ रोजी रात्री जळगावनजीक उमाळा शिवारात ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी कारागृहातच आहेत.
दोषी धरण्यात आलेल्या आरोपींमध्ये वरुण कुमार तिवारी (४२, रा.विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (५२, पवई, मुंबई), नितीन चिंचोले (५६, जळगाव), विकास पुरी (४८, पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (४७, अंबरनाथ, जि.ठाणे), रजनीश ठाकूर (५०, सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम.सेन्थीलकुमार ( ४०,.चेन्नई) या सात जणांचा समावेश आहे.
गौरी प्रसाद पाल (५६, विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (३२, .धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (३४, रा.उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी ( ४५, जनकनगरी, नवी दिल्ली) व विलास रामचंद्र चिंचोले (६८, जळगाव) या पाच जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) पथकाने १३ डिसेंबर २०१३ रोजी रात्री जळगावनजीक उमाळा शिवारात आयोसिंथेटीक या कंपनीत छापा मारला होता. यावेळी एका वाहनात ४५ किलोग्रॅम वजनाच्या केटामाईनच्या प्रत्येकी चार गोण्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चारचाकीतही केटामाईन मिळून आले होते. रात्रभरातून १ हजार १७५ किलो केटामाईन या पथकाने जप्त केले. या गुन्ह्यात १२ संशयितांना अटक करण्यात आली होती. ३ सप्टेबर २०१६ रोजी न्यायालयात दोषारोप दाखल करण्याात आले. डीआरआयतर्फे अ‍ॅड.अतुल सरपांडे व सरकारतर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. संभाजी पाटील यांनी खटल्याचे काम पाहिले. या खटल्यात तब्बल ४४ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

Web Title: Seven persons convicted in the 120-crore Ketamine smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव