मुक्ताईनगरातील रेशनच्या धान्याचे गोदाम मुंबईच्या पथकाकडून सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:26 PM2018-01-22T16:26:32+5:302018-01-22T16:37:27+5:30

आवक-जावक रजिष्टरच्या नोंदी घेऊन पथक जळगावकडे रवाना

Season of ration of warehouse in Muktainagar sealed by Mumbai squad | मुक्ताईनगरातील रेशनच्या धान्याचे गोदाम मुंबईच्या पथकाकडून सील

मुक्ताईनगरातील रेशनच्या धान्याचे गोदाम मुंबईच्या पथकाकडून सील

Next
ठळक मुद्देमुंबईतील तीन सदस्यांनी केली मुक्ताईनगरातील गोदामची तपासणी.आवक-जावक रजिष्टरच्या नोंदींसह अधिकारी जळगावकडे रवानाकारवाई आणि मुंबईच्या तपास पथकाबाबत कमालीची गुप्तता.

आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.२२ - रेशनच्या गहू प्रकरणात रविवारी येथील शासकीय धान्य गोदामास सील लावण्यात आले आहे. मुंबई येथील तीन सदस्याच्या पथकाने तपासणी अंती धान्यगोदाम सील केले आहे. धान्य आवक-जावकच्या नोंदी असलेले दप्तर ताब्यात घेऊन पथक जळगावला रवाना झाले आहे.
सायंकाळी हे तपासणी पथक पुन्हा मुक्ताईनगरात दाखल होण्याची शक्यता आहे.याबाबत मुक्ताईनगर तहसील कार्यालयामार्फत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथे धान्याच्या मापातील पाप उघडकीस आणल्यानंतर मुक्ताईनगरची ही कारवाई लक्षवेधी आहे.
रविवारी हे पथक मुक्ताईनगर येथे दाखल झाले. धान्य गोदामातील धान्यांचे वजन त्यांनी केले. यात काटा ही सदोष असल्याने त्यांनी दुसरा काटा वापरून धान्य मोजले अशी चर्चा आहे. दरम्यान, या तपासणीसाठी आलेले अधिकारी कोण? तसेच काय कार्यवाही झाली याबाबत तहसीलदारांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.
सोमवारी सकाळपासून तहसीलदारांच्या निवासस्थाना लगतच्या धान्यगोदाम वर शुकशुकाट होता. एरवी सोमवार कामकाजाचा दिवस असताना येथे दिसणारी नेहमीची वर्दळ नव्हती. तर गोदामच्या शटरला तहसीलदार रचना पवार यांच्या सहीचे सील लावण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील धान्य गोडावून मधील धान्याच्या गोण्यांमध्ये अफरातफर करुन १०० कोटींचा घोटाळा असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने रविवारी मुंबई येथील तीन अधिकाºयांचे पथक मुक्ताईनगर येथील शासकीय गोडावून मध्ये दाखल झाले होते. परंतु या अधिकाºयांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

 धान्य गोदाम तपासणीसाठी आलेल्या मुंबई येथील पथकातील अधिकारी कोण व कारवाई बाबत ची माहिती देऊ शकत नाही.
- रचना पवार, तहसीलदार, मुक्ताईनगर.
 

Web Title: Season of ration of warehouse in Muktainagar sealed by Mumbai squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.