अमळनेरच्या सुपुत्राने लावला स्पेक्टो फ्लोरोमीटरचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:16 AM2017-12-16T08:16:21+5:302017-12-16T08:16:41+5:30

वैद्यकीय क्षेत्रातील (पॅथॉलॉजी) प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी लागणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ हे अमळनेर येथील विवेक भास्कर बोरसे या विद्यार्थ्यांने शोधून काढले आहे

A search of Amalner's son-in-law Spectro Flowometer | अमळनेरच्या सुपुत्राने लावला स्पेक्टो फ्लोरोमीटरचा शोध

अमळनेरच्या सुपुत्राने लावला स्पेक्टो फ्लोरोमीटरचा शोध

Next

चुडामण बोरसे 
जळगाव : वैद्यकीय क्षेत्रातील (पॅथॉलॉजी) प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी लागणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ हे अमळनेर येथील विवेक भास्कर बोरसे या विद्यार्थ्यांने शोधून काढले आहे. या संशोधनाबद्दल विवेकला ‘लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे’कडून उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
या संशोधनासाठी त्याने पेटंटची नोंदणीही केली आहे. विवेक हा आय.आय.टी. पवईचा विद्यार्थी आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी तसेच फ्लोरोसंट मोजण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ यंत्र हे जर्मन बनावटीचे असते. त्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
पीएच.डी.करणारा विवेक भास्कर याने सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या भारतीय बनावटीचे ‘स्पेक्टोफ्लोरो मीटर’ बनवले आहे. ते अवघ्या एक हजार रुपयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या पैशांची ९९ टक्के बचत होणार आहे.
राष्ट्रपती भवनात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या ‘इनोव्हेशन इन मेडीकल सायन्स अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी’ प्रदर्शनासाठी या संशोधनाची निवड झाली होती. शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, डॉ.रेणू स्वरूप, डॉ.सत्यादास इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे डॉ.सौम्य स्वामीनाथन, कार्यकारी अधिकारी प्रा.अनिल गुप्ता यांनी या संशोधनाबद्दल विवेकचे कौतुक केले होते.
विविध प्रकाराचे निष्कर्ष काढण्यासाठी या नव्या संशोधनाची मदत होणार आहे. विवेक याचे हे संशोधन देशाला लाभदायी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब आॅफ नॉर्थ बॉम्बे संस्थेकडून विवेक यांचा ५० हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यासाठी अभियांत्रिकी, कृषि, विज्ञान, औषध आणि वैद्यकीय शास्त्र या क्षेत्रातून अर्ज मागविण्यात आले होते. यात विवेक बोरसे याची निवड झाल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
विवेक हा अमळनेरातील भारत संचार निगम लिमिटेड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर बोरसे यांचा मुलगा आहे.

आपल्या भारतीय बाजारातही वैद्यकीय साहित्य कमी किंमतीत मिळावे, हा आमचा हेतू होता, या गरजेतून हे नवीन यंत्र संशोधन केले आहे. यात आणखी काही बदल करता येईल काय? यावर आम्ही अभ्यास करीत आहोत.
- प्रा. रोहित श्रीवास्तव, मार्गदर्शक. आयआयटी पवई.

संशोधनासाठी लागले सहा महिने
या ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’च्या संशोधनसाठी सहा महिन्याचा कालावधी लागला. यासाठी खर्च आला तो फक्त दीड हजार रुपये. या ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’मध्ये कलर सेन्सर, वायर्स, प्रोग्रामर आणि पाच व्होल्टची बॅटरी असे साहित्य लागले आहे. सुरुवातीला एक ते दोन डिझाईन्स तयार केले पण ते पसंतीला न पडल्याने पुन्हा प्रयोग करीत राहिलो आणि शेवटी यश मिळाले.
- विवेक बोरसे, विद्यार्थी.
 

Web Title: A search of Amalner's son-in-law Spectro Flowometer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.