15 जूनला वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 09:53 PM2018-06-09T21:53:39+5:302018-06-09T21:53:39+5:30

विद्याथ्र्याचे केले जाणार स्वागत

School Hours on June 15 | 15 जूनला वाजणार शाळेची घंटा

15 जूनला वाजणार शाळेची घंटा

Next
ठळक मुद्दे वृक्ष लागवडीची तयारीशाळांना देणार प्रथमोपचार पेटी
15
ूनला वाजणार शाळेची घंटाशिक्षण समिती सभा: विद्याथ्र्याचे केले जाणार स्वागतजळगाव- 15 जूनला शाळा सुरु होणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्याथ्र्यांच जोरदार स्वागत करावे तसेच शाळांची सजावटही करण्यात यावी, अश सूचना जि.प.च्या शिक्षण समितीच्या झालेल्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी दिली.बदल्यांबाबत केवळ 56 शिक्षकांच्या तक्रारीजिल्ह्यामध्ये बदल्यांबाबत 3367 पैकी केवळ 56 शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. यामुळे पारदर्शकपणे बदल्या झाल्याची माहिती आपण स्थायी समितीच्या बैठकीत दिली होती असे, भोळे यांनी पत्रकारांना सांगितले. जे शिक्षक न्यायालयात गेलेले आहेत अशा शिक्षकांनीही बदली आदेश स्विकारल्याचे ते म्हणाले. पाठय़पुस्तके वितरणाचे काम सुरुगेल्या वषीरच्या पटसंख्येनुसार पाठय़पुस्तके मागविली आहेत. मागणीनुसार 86 टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यातील शाळांसाठी 21 लाख 96 हजार 266 पुस्तके तालुक्यांच्या ठिकाणी वितरीत करण्यात आलेली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्याथ्र्यांना पुस्तके मिळणार आहे. वृक्ष लागवडीची तयारीशाळांच्या आवारामध्ये वृक्ष लागवडीसाठी 43 हजार 174 खड्डे खणण्यचे उद्दीष्ट जिल्ह्यासाठी दिलेआहे. यापैकी 40 हजार 550 खड्डे खोदून तयार आहेत. उर्वरीत कामे येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.8 शाळांना वादळाचा फटकागेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या रावेर, बोदवड, चोपडा येथील शाळेवरील पत्रे उडून गेले. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 8 शाळाचे नुकसान झालेले आहे. या शाळा दुरुस्तीचे प्रस्तावही मागविण्यात आले आहे.शाळांना देणार प्रथमोपचार पेटीशाळेच्या पटांगणावर खेळताना ब:याचदा विद्यार्थी जखमी होतात. यासाठी प्रत्येक शाळेत प्रथमोपचार पेटी ठेवण्याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.शाळांमध्ये मिळणार ‘आधार’ हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. याच पाश्र्वभूमीवर अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने निवारा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्या उघडून देण्यात येणार आहे. यासाठी त्या शाळांची चावी गावातील एका प्रतिष्ठीत नागरिकांकडे ठेवण्याच्याही सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Web Title: School Hours on June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव