सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 03:56 PM2019-03-24T15:56:32+5:302019-03-24T15:56:50+5:30

परमेश्वराने सृष्टी निर्माण करतांना सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये विशेषत्वाने ज्याला जन्माला घातले तो प्राणी म्हणजे मनुष्य होय. देवाने सर्वांना एक ...

Say thank you to Lord Rit Vitthal | सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला

सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला

googlenewsNext

परमेश्वराने सृष्टी निर्माण करतांना सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये विशेषत्वाने ज्याला जन्माला घातले तो प्राणी म्हणजे मनुष्य होय. देवाने सर्वांना एक मेंदू दिला परंतु प्रपंच परमार्थ पृथ्थकरण करता यावे म्हणून दोन मेंदू दिले. सृष्टीतला प्रत्येक प्राणी उभा जन्माला घातला पण मनुष्य मात्र उभा आहे. उभा असूनही माणूस मात्र कुणाच्याही आड आल्याशिवाय राहत नाही. पायाची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारा. डोळ्याची किंमत ज्याला डोळे नाही त्याला विचारा. पण आपणास देवाने इतके सुंदर जन्माला घातले त्याचे एकमेव कारण म्हणजे
दिली इंद्रिये हात पाय कान
डोळे मुख बोलाया वचन
जेणे तू जोडसी नारायण
नासे जीवपणा भव रोग
कारण याच जन्मात देवाचे चिंतन करता येते.
इतर प्राणीयोनीमध्ये चिंतनाला वाव नाही. म्हणून या जन्मात सत ग्रंथाच्या वाचनात सतषुरुषाच्या संगतीत आणि सन्मार्गाने जे जे चांगले प्राप्त करता येईल ते प्राप्त करुन या मानवी जीवनाचे सार्थक करता येईल ते करावे.
आजपर्यंत जड वा चेतन सृष्टी मध्ये अनेक बदल आपण पाहतो, परंतु जगात निर्मितीपासून आजतागायत ज्यात थोडाही बदल करण्याची गरज पडली नाही इतका तंतोतंत देह देवाने आपल्याला दिला. म्हणून या देहात आल्यानंतर आपण मरण येण्याच्या आत त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे म्हणूनच तुकोबाराय म्हणतात
सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला।
नाही तरी गेला जन्म वाया।।
आज पेरलेले धान्य जसे पुढील वर्षी उपयोगात येते त्याचप्रमाणे या जन्मात जे सत्य संकल्पक पुण्य करतो. ते पुढील जन्मात आपल्या सुखावतेला कारण ठरते म्हणून आपला काळ भगवत चिंतनात व्यतीत करावा.
- ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर)

Web Title: Say thank you to Lord Rit Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.