जळगावात कानळदा रस्त्यावर वाळूचे २० डंपर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:46 PM2018-09-18T12:46:25+5:302018-09-18T12:56:51+5:30

On the road of Jalgaon Kanlada caught 20 sand dunes | जळगावात कानळदा रस्त्यावर वाळूचे २० डंपर पकडले

जळगावात कानळदा रस्त्यावर वाळूचे २० डंपर पकडले

Next
ठळक मुद्दे३ डंपर पावतीविनाकारवाईने खळबळ

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदारांनी सोमवारी अचानक कानळदा रस्त्यावरून वाहतूक करणारे २० वाळूचे डंपर पकडले. त्यांना दूध डेअरीपर्यंत आणून तेथे रस्त्यावरच पावत्यांची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता ३ डंपर चालकांकडे पावत्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उर्वरीत डंपर सोडून देण्यात येऊन हे तीन डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. मात्र अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या तपासणी कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.
सोमवार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अचानक तहसीलदार अमोल निकम हे कर्मचाºयांच्या ताफ्यासह कानळदा रस्त्यावर पोहोचले. त्या रस्त्याने वाळू वाहतूक करणारे एक-दोन नव्हे तब्बल २० डंपर पकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. त्यामुळे हे वृत्त लगेच सगळीकडे पसरले. जिल्हा दूध संघापर्यंत हे डंपर आणल्यावर त्या रस्त्याला ते उभे करण्यात येऊन एकेका वाहनाकडील वाळू वाहतुकीची पावती व कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात १७ डंपरकडे दोनगाव ठेक्याची पावती असल्याचे आढळून आल्याने ती वाहने सोडून देण्यात आली.
वाळू ठेक्याच्या ठिकाणी पाणी असल्याचे तहसीलदार व प्रांताधिकाºयांचे म्हणणे आहे तर मग वाळू ठेकेदार एकाचवेळी २०-२० डंपर वाळू वाहतील एवढी वाळू कुठून उपसा करीत आहे? एकतर ठेक्याच्या जागेत पाणी नाही. तरीही मोजणी करणे हेतूपूर्वक टाळले जात आहे.

Web Title: On the road of Jalgaon Kanlada caught 20 sand dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.