Rickshaw returns to the father's eyes, after death | रिक्षा उलटून पित्याच्या डोळ््यासमोर मुलाचा मृत्यू
रिक्षा उलटून पित्याच्या डोळ््यासमोर मुलाचा मृत्यू

तोंडापूर, ता.जामनेर : चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटल्याने त्याखाली दबून सुमित गौतम साळवे (रा. ढालसिंगी, ता. जामनेर) हा इयत्ता सहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता तोंडापूर-ढालसिंगी रस्त्यावर घडली.
शुक्रवारी तोंडापूरचा आठवडे बाजार असल्याने सुमीत हा सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ढालसिंगीला बसने न जाता त्याच्या वडिलांच्या रिक्षात (क्र. एम. एच. १९, ए.एस. १५१८) गावी जाण्यासाठी बसला. काही अंतरावर जाताच रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली व सुमीत त्यात दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्याच रिक्षात मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


Web Title: Rickshaw returns to the father's eyes, after death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.