शरद पवार; वारकरी सांप्रदायाच्या शिष्टमंडळाला आश्वासन
सांगोला (जि़ सोलापूर) : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकरी सांप्रदयाने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी २ जूनला शासनाला निवेदन सादर करावे. यामुळे पालखी सोहळ्याच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीने अधिवेशनानंतर बैठकीच्या माध्यमातून सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी सांप्रदयाच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले.
यावेळी वारकरी सांप्रदायाच्या शिष्टमंडळाने प्रत्येक मुक्काम राहण्याच्या ठिकाणची व्यवस्था, पाणी, वीज, शौचालय तसेच हे तळ कायमस्वरुपी आरक्षित केले पाहिजेत. देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करणे, १० वर्षांपासून तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यांच्या नियोजनामध्ये वारकरी प्रतिनिधीचा समावेश करुन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती गठित करताना वारकरी प्रतिनिधीला नेमावे अशा भावना खा. शरद पवार यांच्याकडे व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)