जळगावात काँग्रेसने बंद पाडले ‘इंदू सरकार’चे खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:43 PM2017-07-28T12:43:03+5:302017-07-28T12:44:18+5:30

‘इंदू सरकार’ चित्रपटाचे जळगावातील पहिल्याच दिवशीचे खेळ काँग्रेस पदाधिकारी, कार्यकत्र्यानी चित्रपटगृहात जाऊन बंद पाडले

The Release of 'indu sarkar' was stopped by Congress in Jalgaon | जळगावात काँग्रेसने बंद पाडले ‘इंदू सरकार’चे खेळ

जळगावात काँग्रेसने बंद पाडले ‘इंदू सरकार’चे खेळ

Next
ठळक मुद्देआणीबाणीच्या काळातील कथानक या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच संजय गांधी यांचेही पात्र चित्रपटातून इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रय} झाला असल्याचा आरोप

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - आणीबाणीच्या काळातील कथानक असलेला मधुर भांडारकर दिग्दर्शीत ‘इंदू सरकार’ चित्रपटाचे जळगावातील पहिल्याच दिवशीचे खेळ काँग्रेस पदाधिकारी, कार्यकत्र्यानी चित्रपटगृहात जाऊन बंद पाडले. 
सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास काँग्रेसभवनमध्ये जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.ए.जी. भंगाळे, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, सेवादलाचे राजस कोतवाल, ब्लॉक अध्यक्ष शाम तायडे, एनएसयुआयचे देवेंद्र मराठे आदी सर्व पदाधिकारी व  कार्यकर्ते जमले. आधी नटवर थिएटरकडे व नंतर आयनॉक्सकडे त्यांनी मोर्चा वळविला. तेथील खेळ बंद पाडला.
आणीबाणीच्या कालावधीतील कथानक असलेल्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच संजय गांधी यांचेही पात्र दाखविण्यात आले आहेत. या चित्रपटातून इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रय} झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Web Title: The Release of 'indu sarkar' was stopped by Congress in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.