उमेदवार न मिळाल्यानेच ‘रावेर’ काँग्रेसकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:18 PM2019-03-30T12:18:38+5:302019-03-30T12:20:33+5:30

राष्ट्रवादीकडून अखेर तडजोड : डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर

"Raver" due to non-availability of the candidate, the Congress | उमेदवार न मिळाल्यानेच ‘रावेर’ काँग्रेसकडे

उमेदवार न मिळाल्यानेच ‘रावेर’ काँग्रेसकडे

Next

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर शुक्रवार, २९ मार्च रोजी सुटला. ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात आली आहे. मात्र उमेदवाराची घोषणा शनिवार, ३० मार्चपर्यंत वरिष्ठांकडून होईल, अशी माहिती काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. राष्टÑवादीला उमेदवार न मिळाल्याने व बाहेरून तगडा उमेदवार आयात करण्यातही अपयश आल्यानेच राष्टÑवादीने ही तडजोड केल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे नाव या जागेसाठी आघाडीवर आहे. काँग्रेसने नाव निश्चित केल्याच्या वृत्तास स्वत: डॉ. उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला असून अधिकृत घोषणा श्रेष्ठीच करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दबावतंत्राचा वापर ठरला यशस्वी
रावेरच्या जागेची सातत्याने मागणी करुही न मिळाल्याने काँग्रेसने दबावतंत्राचाही उपयोग केला. त्याचाही फायदा झाला.
पाच इच्छुकांचे होते अर्ज
अ‍ॅड. संदीप पाटील यांनी रावेरसाठी उमेदवाराची घोषणा शनिवारी  वरिष्ठांकडून होईल,असे स्पष्ट केले. या जागेसाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार निळकंठ फालक (भुसावळ), डॉ.जगदीश पाटील (मुक्ताईनगर), अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुजावर शेख (भुसावळ), प्रा.हेमंत चौधरी यांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केले असल्याची माहितीही जिल्हाध्यक्षांनी दिली.
मुख्य प्रचार कार्यालय जळगावातच
रावेर मतदार संघाची निवडणूक आम्ही लढवणार असलो तरी जळगाव येथील कॉग्रेस भवन हेच मुख्य प्रचार कार्यालय राहील असे डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पत्रपरिषदेस प्रदेश चिटणीस डी.जी. पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, सरचिटणीस अजबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अ‍ॅड. अविनाश भालेराव, उल्हास साबळे आदींची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्षांकडून हिरवा कंदील- डॉ. उल्हास पाटील
रावेरच्या जागेवर आपली उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीवरुन आपणास दिली असल्याची माहिती डॉ. उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१२ वर्षानंतर जागा मिळाली
ही जागा मूळ काँग्रेसचीच असून गेली पोटनिवडणूक व दोन टर्म साठी (१२ वर्ष) या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिला. परंतु दोन्ही वेळेस त्यांना यश आले नाही. यामुळे काँग्रेसने या ठिकाणी दावा केला व पाठपुरावाही केला.

Web Title: "Raver" due to non-availability of the candidate, the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.