रतनलाल बाफना यांची ‘सुवर्ण भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:20 PM2018-12-16T12:20:39+5:302018-12-16T12:20:56+5:30

हितेंद्र काळुंखे जळगाव : कोणतीही कला असो... एखाद्या कलावंताची छाप ही हटके असते. याचप्रकारे कोणताही व्यापार असो.. एखादा व्यापारी ...

Ratanlal Bafna's gold fiasco | रतनलाल बाफना यांची ‘सुवर्ण भरारी

रतनलाल बाफना यांची ‘सुवर्ण भरारी

Next

हितेंद्र काळुंखे
जळगाव : कोणतीही कला असो... एखाद्या कलावंताची छाप ही हटके असते. याचप्रकारे कोणताही व्यापार असो.. एखादा व्यापारी हा ग्राहकांच्या मनात एक विश्वासाचा ठसा उमटवून ठेवतो. याच धोरणानुसार ‘जहाँ विश्वास’ ही परंपरा है’ हे ब्रिद घेवून सोने- चांदीच्या व्यापार क्षेत्रात स्वत: सह जळगावचे नावही उंचीवर नेणारे रतनलाल सी. बाफना आज ८३ व्या वर्षीही पूर्ण वेळ काम करताना दिसतात.
राजस्थान मधील भोपालगढ या गावात साधारण कुटुंबात रतनलाल बाफना यांचा जन्म झाला. वडील चुनीलाल बाफना यांचा लहानसा कपड्यांचा व्यापार होता. यातून घरखर्च जेमतेम भागायचा. यामुळे रतनलाल बाफना अवघ्या १९ व्या वर्षी केवळ १० वीचे शिक्षण आणि काहीतरी करायचे अशी उमेद अशा शिदोरीसह घराबाहेर पडले. १९५४ मध्ये ते आपले नशिब आजमावण्यासाठी जळगावमध्ये आले. प्रसिद्ध आर. एल. या सोन्याच्या पेढीत नोकरी केली. १०० रुपये पगारावर कामाची सुरुवात झाली. मेहनतीने काम केल्याने जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि पगारही. १९७४ सालात त्यांना १० हजारापर्यंत पगार गेला.
व्यापाराचे गुण जागे झाले
नोकरी दरम्यान रतनलाल बाफना यांनी काटकसरीने जीवन जगत असताना ५ लाख रुपये जमविले होते. वडील व्यापारी होते आणि हा गुणही रतनलाल बाफना यांच्यात होताच. हा गुण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. १९७४ मध्ये १० हजाराची नोकरी सोडत त्यांंनी आता सराफबाजारातील सुभाष चौकाजवळ ज्या ठिकाणी सिल्व्हर हाऊस आहे, त्या ठिकाणी आर. सी. बाफना ज्वेलर्स या नावाने सोने- चांदीचे छोटे शोरुम सुरु केले. अवघ्या चौघा कामगारांच्या सहाय्याने त्यांनी हे इवलेसे रोप लावले. मेहनतीला नशिबाची साथ या ठिकाणी चांगलीच लाभली.
मुलांची लाभली समर्थ साथ
व्यवसायाच्या विस्तारात मुलगा सुशीलकुमार (पप्पूशेठ) बाफना यांची समर्थ साथ रतनलाल बाफना यांना लाभली. कॉप्युुटराईज्ड कामकाज स्विकारत त्यांनी कामात सुलभता आणली. विविध डिझाईन तंत्रज्ञान आणले. सुशील कुमार यांच्या पाठोपाठ द्वितीय पुत्र सिद्धार्थ हे देखील व्यवसायात उतरले. हो दोघे भाऊ एमबीए असून शोरुम मध्ये महिलांना संधी देण्याचे कामही त्यांनी केले.
सेवेचा वारसाही स्विकारला
मिळालेल्या प्रचंड यशात ग्राहकांचा मोठा वाटा आहे, हे मानत रतनलाल बाफना यांनी समाजसेवेतही मोठे योगदान दिले आहे. अनेक वर्षांपासून ते अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप करीत असून वाजवी दरात गरजूंना अन्न मिळावे यासाठी ‘क्षुधाशांती’ केंद्रात योगदान दिले. तहानलेल्यांसाठी जलमंदिर उभारले. महिलांना शिवण वाटप, रुग्णांवर औषधोपचार आदी कार्यासह शाकाहाराचा प्रचार करीत गोसेवेसाठी कुसुंबा येथे भव्य गोशाळा उभारली. व्यापारासोबतच रतनलाल यांचा सेवेचा वारसाही त्यांच्यामुलांनीस्विकारलाआहे.
आणि उभे राहिले भव्य ‘नयनतारा’
हळूहळू प्रगतीपथाकडे वाटचाल होत राहिली. रनलाल बाफना यांनी १९८८ रोजी सराफ बाजारातच ‘नयनतारा’ हे भव्य शोरूम सुरू केले. काहीदिवसातच चांदीच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र असे ‘पारसमहल’ हे नवे शोरूम १९९४ मध्ये सुरू करण्यात आले. बाफनांचा व्यवसाय बहरतच गेला.आज त्यांच्या जळगाव शहरातील तीन शोरूमसह औरंगाबाद, नांदेड व नाशिक येथेही या व्यवसायात त्यांनी यश मिळविले आहे.

प्रामाणिकपणे काम केले तर यश हे नक्कीच मिळते. व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे असते. ग्राहकांच्या प्रेमामुळेच आपण प्रगती करु शकलो. आज मुलेही आपले काम चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत, याचा आंनद आहे.
-रतनलाल सी. बाफना

 

Web Title: Ratanlal Bafna's gold fiasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.